मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांचा एकाच वाक्यात विषय संपवला..म्हणाले..

0 165

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली. अंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार परिषदेत त्यांनी जरांगेवर सडकून टीका केली. भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. ‘मी स्व-कष्टाचे खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही’, अशी जहरी टीका त्यांनी केली. पण भुजबळांची भाषा खालच्या पातळीची असल्याचा आरोप करत त्यांचे वय झाल्याचा पलटवार जरांगे यांनी केला. त्यांना राज्यातील वातावरण बिघडवायचे असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. यापुढे मराठा समाज भुजबळांना महत्व देणारा नाही, असे म्हणत त्यांनी हा विषय संपवला.

 

जरांगे-पाटील म्हणाले, “छगन भुजबळ वयाने मोठे आहेत. तुमची माहिती आम्हीही गोळा केलीय. येथे सासरा आणि जावयाचा प्रश्न नाही. आमच्या पायावर पाय देऊ नका अन्यथा तुमची काही खरे नाही. भानावर येऊन बोला, कारण मराठ्यांच्या शेपटीवर पाय दिल्यावर काय होते, हे पुढील काळात कळेल. धमक्या देऊन राज्यातील शांतात बिघडवू नका.”

भुजबळांचे आता वय झाले

भुजबळांचे आता वय झाले आहे. त्यामुळे ते अशी टीका करत असल्याचा टोला जरांगे यांनी हाणला. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणारच, असे ते म्हणाले. भुजबळ यांना मी मुरब्बी नेता समजत होतो. पण त्यांची वक्तव्य अत्यंत खालच्या पातळीची आहेत. मराठा त्यांचा दर्जा घसरु देणार नाही. आपले पण शिक्षण झाले आहे. त्यामुळे काय बोलावे आणि आरक्षणाच्या मुद्यावर काय मांडावे हे कळते असे त्यांनी स्पष्ट केले.

“आमचं आरक्षणावरील लक्ष हटणार नाही”

“छगन भुजबळांना टीका करण्यापलीकडे काही राहिलं नाही. मराठा समाज ओबीसीत आल्याचं त्यांना कळून चुकलं आहे. पण, कितीही टीका केली, तरी आमचं आरक्षणावरील लक्ष हटणार नाही. राज्यातील शांतता बिघडवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू झाले आहेत,” असा आरोपी जरांगे-पाटलांनी ओबीसी सभेतील नेत्यांवर केला.

“आमचं आरक्षणावरील लक्ष हटणार नाही”

“छगन भुजबळांना टीका करण्यापलीकडे काही राहिलं नाही. मराठा समाज ओबीसीत आल्याचं त्यांना कळून चुकलं आहे. पण, कितीही टीका केली, तरी आमचं आरक्षणावरील लक्ष हटणार नाही. राज्यातील शांतता बिघडवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू झाले आहेत,” असा आरोपी जरांगे-पाटलांनी ओबीसी सभेतील नेत्यांवर केला.

error: Content is protected !!