पडेगाव येथे 700 जणांची नेत्र तपासणी,संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनचा उपक्रम
परभणी,दि 14 ः
गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन अंतर्गत दक्षिणमुखी हनुमान मंदिर सप्ताह व स्वराज शामसुंदर निरस याच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 13 मे रोजी मोफत आरोग्य निदान व उपचार शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका मंजुषा दर्डा व वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातशेहून अधिक ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेविका मंजुषा दर्डा, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितीमध्ये माजी सभापती बालासाहेब निरस,माजी सभापती राम प्रभू निरस, गावचे सरपंच नारायण बोबडे, चेअरमन माऊली बोबडे, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर निरस,शामसुंदर निरस यांच्यासह माझ गाव माझं तीर्थ अभियानाचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.