हातातील पिशवी हिसकावून घेवून तीन लाखाची रोकड पळवली
सेलू ( नारायण पाटील )
स्टेट बँक ऑफ इंडिया मधून तीन लाखाची रोकड घरी घेऊन जात असता हातातील पैशाची पिशवी हिसकावून घेऊन तीन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना शहरातील स्वामी विवेकानंद येथे घडली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,येथील स्वामी विवेकानंद नगर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त स .सचिव देविदास जोगराम चव्हाण यांनी दि ६ /२ /२५ रोजी दुपारी तीन च्या सुमारास येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधून तीन लाख रुपये काढले .व एका पिशवीत टाकून ते रिक्षा मधून आपल्या घरी जात होते .घरापर्यंत आटो जात नसल्यामुळे ते शेजारी गात यांच्या घरासमोर आटो उभाकरून पैशाची पिशवी हातात घेऊन पायी घरी जात असतानाच समोरून दोन अनोळखी इसम पल्सर गाडीवर त्यांच्या जवळ आले .व गाडीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या हातातील पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेऊन सर्वोदय नगर च्या दिशेने पळून गेले .
देविदास जोगराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा सेलू पोलिसात दोन अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .सदरील प्रकारणी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करीत आहेत .
अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे ,पोलीस उपविभागीय अधिकारी जीवन बेनिवाल ,सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे ,पोलीस निरीक्षक दीपक बोरसे व एपीआय प्रभाकर कवाळे व चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले आहे .