हादगाव बु.परीसरात जोरदार पाऊस; पिकात पाणी साचले
पाथरी, रमेश बिजुले – मागिल तीनचार दिवसा पासून उघडीप दिलेल्या पावसाने गुरूवारी पाथरी तालुक्यात सकाळच्या सुमारास हलक्या सरींनी हजेरी लावली. त्या नंतर दिवसभर उन सावल्यांचा खेळ सुरू होता. दरम्यान चार च्या सुमारास हादगाव मंडळात एक तास जोरदार पाऊस झाल्याने पिकात पाणी साचले.
जुलै महिण्यात दमदार पणे पडलेल्या पावसाने मागिल तीन चार दिवसा पासुन उघडीप दिली होती. गुरूवारी ४ ऑगष्ट रोजी पहाटे पासुन आकाशात ढग दाटून येत आहेत.सकाळच्या सुमारास तालुक्याच्या अनेक भागात रिमझिम पाऊस पडला. तर या नंतर दिवसभर उन सावल्यांचा खेळ पहावयास मिळाला.
सायंकाळी ४ च्या सुमारास हादगाव बु. येथे तब्बल एक तास जोरदार पाऊस झाल्याने कापुस,सोयाबीन कापूस च्या पिकात पाणी साठले. साठले आहे सकाळपासून तालुक्यातील रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे हादगाव मंडळात जोरदार पाऊस झाला तब्बल एक तास पाऊस झाल्याने शेती शिवारात पिकामध्ये पाणी सचले आहे