अश्‍लील गाण्यांवर अधिका-यांचा जनतेसोबत जबरदस्त डान्स, पहा व्हायरल व्हिडिओ

0 160

4 ऑगस्टला प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांची जयंती (Actor Kishore Kumar’s birth anniversary) आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथे त्यांच्या जन्मगावी हा दिवस गौरव दिवस म्हणून साजरा केला जात आहे. तीन दिवसीय गौरव दिनाअंतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या अंतर्गत आज म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी खांडवा येथे झुंबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खांडव्याच्या जिल्हा पंचायत सीईओ आणि महानगरपालिकेच्या आयुक्त सविता प्रधान यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी ‘आँख मारे’ या गाण्यावर धमाल नृत्य (Dance to the song ‘Aankh Mare’) केले.

 

किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रोग्रॅममध्ये दिल धडकाए, सिटी बाजाए, आँख मारे या गाण्यावर जिल्हा पंचायत CEO आणि नगर निगम कमिश्नर सविता प्रधान यांनी तुफान डान्स केल्याचा एक व्हिडिओ बराच viral होत आहे. या व्हिडिओमुळे या महिला अधिकारी सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोल होत आहेत. काहींनी तर तर थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट करून कारवाईची मागणी केली आहे.

 

विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा प्रमुखांकडून एक ट्विट जारी करण्यात आलं असून त्यात त्यांनी असं म्हटलं, “खंडवा जिल्हा पंचायत CEO आणि नगर निगम कमिश्नर खंडवा गौरव दिवशी शालेय मुलामुलींवर अश्लील गाण्यांमार्फत कोणता गौरव पुढे नेण्याची शिकवण देत आहेत? आयोजकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.”

 

यामध्ये रस्त्यावर अनेक तरुण आणि शालेय मुलांसह अधिकारी सुद्धा डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र त्यांनी लावलेल्या गाण्यांवरून सध्या त्यांच्यावर सडकून टीका होत आहे.

error: Content is protected !!