३१ जानेवारी 2023 रोजी कै.रावसाहेब जामकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
परभणी, प्रतिनिधी – नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी संचलित कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, जिंतूर रोड ,परभणी येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष रावसाहेबजी जामकर साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ माजीमंत्री, भारतभूषण,कै. रावसाहेब जामकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे दि.३१ जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक विचार व सद्यस्थिती असा विषय ठेवण्यात आला आहे.
सदरील स्पर्धा पदवी, पदव्यूत्तर वर्गात शिकत असलेल्या युवक युवतींसाठी असून स्पर्धेत सहभागा साठी प्राचार्य यांच्या सहीचे संमतीपत्र, महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणावे.स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी नोंदणी करणे आवश्यक आहे.या स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश फिस ठेवण्यात आली आहे.
राज्यस्तरीय या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांका साठी ५००० रु सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र. व्दितीय क्रमांका साठी ३००० रु सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र.तृतीय क्रमांका साठी २००० रु सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र.तर उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी १००० रु सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र.अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपञ देण्यात येणार आहे. बाहेर गावाहून आलेल्या स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था अपवादात्मक परिस्थितीत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येईल.
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे उदघाटन ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उदघाटक म्हणून नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर यांची उपस्थिती राहणार आहे. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून देगलूर महाविद्यालय, देगलूर येथील साहित्यिक प्रा.डॉ.राजेश्वर दुडूकनाळे यांची उपस्थिती असणार आहे.
स्पर्धेच्या समारोप व बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. किरणराव सुभेदार यांची उपस्थिती राहणार आहे ॲड.किरणराव सुभेदार यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान केले जातील.व्यासपिठावर प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांची उपस्थिती असणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लागार समीतीचे डॉ.संगीता आवचार ( उपप्राचार्य ), प्रसिध्दी प्रमुख प्रा.अरुण पडघन,प्रा.निर्मला जाधव ,संयोजन समीतीच्या डॉ.आशा गीरी, डॉ.ओमप्रभा लोहकरे, डॉ.संगीता लोमटे, डॉ.नसिम बेगम यांचे सह डॉ.अभिजित सरनाईक सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे योगदान लाभत आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ वसंतराव भोसले आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.