नूतन विद्यालयात “आर्थिक साक्षरता व बँकांचे व्यवहार” या विषयावर व्याख्यान
सेलू,दि 29 ः
सोमवार दि. 29 जानेवारी रोजी नूतन विद्यालयामध्ये “आर्थिक साक्षरता व बँकांचे व्यवहार” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील एस. व्ही.तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते श्री विश्वास देव शाखा व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी बँक, मर्यादित सेलू, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री देशपांडे के.के. व सोन्नेकर डी. डी.यांची उपस्थिती होती.
या वेळी विश्वास देव सरांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव बचतीचे महत्त्व, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी ,बँकांचे व्यवहार इत्यादी विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पटाईत ए. पी., कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षीरसागर एस. एन यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षीरसागर यु. डी., कडे के. एस., आंबेकर ए. एल., पाटील ए. ए., मलसटवाड एस.बी यांनी पुढाकार घेतला तर आभार तोडकर एस. आर. यांनी केले.