वनसगावची पहिली महिला एम बी बी एस पदवी प्राप्त डॉ तृप्ती शिंदे हिचा विद्यालयात सन्मान

0 172

 निफाड,दि 29 ः
वनसगाव तालुका निफाड येथील  डॉ. तृप्ती उत्तमराव शिंदे ही ग्रामीण भागातून पहिली महिला एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सत्कार करण्यात आला.

वनसगांव विद्यालयाचे माजी विद्यार्थीं  डॉ.उत्तमराव दत्तात्रय पा.शिंदे व सौ.योगिता उत्तमराव पा.शिंदे यांची सुकन्या डॉ.तृप्ती शिंदे हीने  जिद्द,चिकाटी,साहस व अथक परिश्रमाच्या बळावर सातत्याने पाच वर्षाची प्रयत्नांची पराकाष्ठा करत सामर्थ्याने व आत्मविश्वासाने कोरोना सारख्या कठीण काळातही संघर्ष करून ‘ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी किर्गिस्तान येथे ‘एम.बी.बी.एस.पदवी प्राप्त केली आहे.
“वनसगांव च्या शिंदेंच्या वाड्यातील पहिलीच एम.बी.बी.एस.होणारी डॉ.तृप्ती शिंदे चे बालपण भोयेगांव,सोग्रस व पिंपळगाव बसवंत सारख्या ग्रामीण भागात गेलेले असून सुद्धा हीने वैद्यकीय क्षेत्रातील ‘एम.बी.बी.एस पदवी प्राप्त केल्याबद्दल वनसगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डॉ. तृप्ती उत्तमराव पा.शिंदे व डॉ.उत्तमराव दत्तात्रय पा.शिंदे डायरेक्ट में. फार्मर बायो-टेक पिंपळगाव ब.ता. निफाड यांना वनसगांव विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सी.डी.रोटे , पर्यवेक्षक के.बी. दरेकर , वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष रामभाऊ आवारे , गणेश बॅकेचे उपाध्यक्ष उन्मेष डुंबरे, मा चेअरमन मधुकर आप्पा शिंदे, स्थानिक स्कूल कमिटी चे अशोकराव डुंबरे, शिवाजी नाना शिंदे,राणुजी कापडी, चेअरमन अशोक शिंदे, संचालक ज्ञानेश्वर पाटील, एकनाथ केदारे, एन.पी. गवळी , अरूण भिकाजी वाघ , धनंजय रत्नाकर डुंबरे-अध्यक्ष वनसगांव शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष मनेष शिंदे, व्यवस्थापक वनसगांव शिक्षण प्रसारक मंडळ एकनाथ दादा शिंदे, सुनील उमाजी शिंदे अध्यक्ष- वनसगांव शाळा व्यवस्थापक समिती,दौलत कापडी , सचिन शिंदे, सुनिल माघारी आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

error: Content is protected !!