आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर मोठा निर्णय, 6 याचिकांमध्ये 34 याचिका एकत्र करणार

0 12

सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विविध याचिकांवर सुनावणी घेण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्याचा आदेश दिलाय. विशेष म्हणजे कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विधानसभा अध्यक्षांसोबत दसऱ्याच्या सुट्टींमध्ये एकत्र बसून याचिकांचं वेळापत्रक ठरवण्याची सूचना केलीय. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक जाहीर करणं बंधनकारक आहे. त्यानुसार आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुनावणी घेतली. यावेळी काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या.

आता पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणीत वर्गवारी करण्यात आले. 34  वेगवेगळ्या याचिका आता यापुढे 6 याचिकेत मांडल्या जातील. ठाकरेंच्या वकिलांनी आज पुन्हा एक नवा अर्ज केला आहे. काही डॉक्युमेंट हे शिंदे गटाकडून मागितले. 25 ऑक्टोंबरपर्यंत सगळ्यांनी आपले मत मांडायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे 26 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल.

ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. अर्जावर अर्ज येत आहेत. जर अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सुप्रीम कोर्टातील याचिका वेगळी आहे. इथली याचिका वेगळी आहे. हे ट्रिब्यूनल अर्थात लवात आहे. इथे प्रक्रिया आहे. इथे ट्रायल होते, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

राहुल नार्वेकरांची नाराजी 

राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी वक्त केली. दरवेळेस वेगवेगळ्या याचिका अर्ज दाखल केले जातात. त्यात वेळ घालवला जातो. येथे एक भूमिका आणि सर्वोच्य न्यायालयात वेगळी भूमिका का घेता, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला केला.जर मी सुनावणी घेत आहे
तर सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशा सूचना राहुल नार्वेकरांनी दिल्या.

आजच्या सुनावणीत काय झालं?

विधानसभा राहुल नार्वेकरांसमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये आज एकत्रित असे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 34 याचिका आहेत. याच 34 याचिकांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 1 ते 16  ठाकरे गटाच्या याचिका असतील. एकंदरीत ढोबळ वर्गवारी केली असल्याची माहिती वकिलांनी दिली.

error: Content is protected !!