रील्स बनवा, बक्षिसे मिळवा

0 76

परभणी – आजच्या युवा पिढीमध्ये रिल्स तयार करण्याचे विशेष आकर्षण आहे. युवा पिढीचे हेच आकर्षण पाहून परभणी लोकसभा मतदार संघाच्या ‘स्वीप’ कक्षाच्यामार्फत 18 वर्षावरील युवक-युवतींसाठी मतदान जनजागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढावी या विषयावरील रिल्स तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

परभणी जिल्हा प्रशासनाने स्वीप कक्षाच्या माध्यमातून परभणी लोकसभा निवडणुकी मध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जनजागृती बाबत आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी रिल्स बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या युवक-युवतींनी दिलेल्या विषयावरील रिल्स एक मिनिटाची असणे आवश्यक आहे. तसेच ती याआधी कुठल्याही समाज माध्यमांवर प्रसारीत झालेली नसावी. रिल्समध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचे, उमेदवाराचे तसेच राजकीय पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देखील नसावे. निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करूनच रित्स तयार केलेली असावी.

 

 

या रिल्स स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे विषय असणार आहेत. यामध्ये ‘उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा’, ‘सर्व मतदारांनी मतदान करावे’, ‘माझं मत माझं भविष्य’ हे विषय असणार आहेत. या स्पर्धेत स्पर्धकांना दि. 15 एप्रिलपर्यंत सहभाग नोंदवता येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या रिल्स 9922119995 या व्हॉट्सअॅप क्रमाकांवर एचडी क्वालिटी मध्ये सादर कराव्यात.

 

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये, तृतीय पारितोषिक एक हजार रुपये असून उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी त्र्यंबक वडसकर (9922119995), अरविंद शहाणे (8552802280) आणि डॉ. सिद्धार्थ मस्के (9420792342) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच परभणी लोकसभा मतदार संघातील जास्तीत-जास्त युवकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे.

error: Content is protected !!