बुधवार पासून सेलूमध्ये श्रीसाई महोत्सवास सुरुवात

भागवत कथा, कीर्तनांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

0 47

सेलू / नारायण पाटील – गुढीपाडवा व श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील महेशनगर मधील श्रीसाईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने १० एप्रिल बुधवारपासून भव्य ” श्रीसाई महोत्सवाचे “आयोजन करण्यात आले आहे.
१० ते १७ एप्रिल या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

 

 

दि १० एप्रिल बुधवारपासून दुपारी एक ते पाच या वेळेत श्रीमद् भागवत कथा या ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे . भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीमधून भागवत कथेचे निरूपण होणार आहे . तसेच दररोज सायंकाळी सात वाजता कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन असून १० एप्रिल बुधवारी विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले, ११ एप्रिल गुरुवारी जलाल महाराज सय्यद १२ एप्रिल शुक्रवारी नेहाताई भोसले, १३ एप्रिल शनिवारी प्रसाद महाराज काष्टे, १४ एप्रिल रविवारी विनोदाचार्य नामदेव महाराज फपाळ, १५ एप्रिल सोमवारी संस्कार महाराज खंडागळे यांचे कीर्तन आहे. तसेच १६ एप्रिल मंगळवारी जोशी परिवार, सेलू प्रस्तुत ‘अमृतायण’ हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम, तर १७ एप्रिल बुधवारी सकाळी दहा वाजता ह भ प शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन होणारआहे.

 

दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवानंतर महाप्रसाद (नगरभोजन)चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या भव्यदिव्य होणाऱ्या महोत्सवातील विविध कार्यक्रमांना सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

▪️ भागवत कथेमध्ये जोडप्याचा विवाह

९ एप्रिल मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त सकाळी दहा वाजता महिलांसाठी ‘सुंदर माझी गुढी स्पर्धा’ आहे. तर गुरूवारी, १७ एप्रिलरोजी श्रीरामनवमीनिमित्त सायंकाळी सात वाजता श्रीराम व साईबाबांची महाआरती होईल. श्रीमद् भागवत कथेतील श्रीकृष्ण-रुक्मीणी विवाहप्रसंगी १५ एप्रिलरोजी चि.अजय व चि.सौ.कां.पूनम या जोडप्याचा विवाह श्रीसाईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न संस्थान च्या वतीने करण्यात आला आहे.

error: Content is protected !!