डॉ ज्ञानोबा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मातृ पितृ पूजन सोहळा संपन्न
आजच्या युगात पालक व मुलांमधे कमी झालेला संवाद व त्यातून कौटुंबिक समस्या निर्माण होतात ही बाबा लक्षात घेऊन प्रकृती केअर फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ ज्ञानोबा मुंडे यानी वाढदिवसानिमित्त ह.भ.प. स्वप्निल महाराज काळाने यांचे व्याख्यान व मातृ पितृ पूजन हा उपक्रम घेतला या मधे 200 हुन अधिक कुटुंबांनी सहभाग घेतला तसेच मुलांनी व पालकानी या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास विविध मान्यवारांनी उपस्तिथी लावली या मधे मा नगरसेविका श्रीमती रंजणाताई टिळेकर, मा नगरसेवक श्री वीरसेन जगताप, मा स्वि नगरसेवक श्री अनिल येवले, नगरसेविका सौ वृषाली कामठे, कोंढवा पोलिस स्टे. चे व पो नी श्री संतोष सोनवने, येवले फाउंडेशन चे नीलेश येवले, श्री रमेश गायकवाड़, मा सरपंच श्री व्यंकोजी खोपडे, विकास नाना फाटे, सशक्त माहिला मंच च्या शिवकण्याताई बारगजे, देषमुख लॉ असोसिएट्स चे तनय देशमुख, शिवप्रतिष्ठान चे सुशांत लांडगे, यशश्री कोचिंग क्लास चे श्री यश भोसले व श्री सिद्धेश्वर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी प्रकृती केअर फाउंडेशन, शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ, सशक्त माहिला मंच देशमुख लॉ असोसिएट्स व मित्रपरिवाराने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
सर्व नागरिक व मान्यवरांनी डॉ ज्ञानोबा मुंडे यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले.