अवकाळीतच महावितरणची बत्ती गुल, झरीसह 64 गावात विज पुरवठा खंडित

0 72

अनिल जोशी
झरी,दि 21 ः
उकाड्याने त्रस्त नागरीकांना आवकाळी पावसाचा फटका बसला.शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे दुपारी 4 वाजता झरी ता.परभणी व परिसरातील 64 गावातील विजपुरवठा तब्बल 24 तास खंडित राहीला.
सद्यस्थितीला महावितरण ग्रामीण भागात वसुलीवर अधिक भर देत असताना त्यांना सोयीसुविधा देण्याबाबत महावितरणचे अधिकारी महावितरणचे अधिकारी याबाबत कानाडोळा करीत आहेत. हे वेळेप्रसंगी महावितरण चे पैसे न भरल्यास विद्युत बत्ती गुल करण्याचा प्रकार अधिक वाढल्यामुळे तसेच  विजेसंदर्भातील तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने सर्वसामान्यांमध्ये चीड निर्माण होत आहे,
झरी सह परिसरात विज कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक राहीले नाही.त्यांचा  मनमानी कारभार चालू असल्यामुळे वेळेप्रसंगी फ्यूज साठी सामान्य ग्राहकास पैसे मोजावे लागत असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत कुठलेही सोयरसुतक नाही. येथील कर्मचारी सकाळी बारा वाजता येणे सही करणे आणि निघून जाणे हा प्रकार चालू असल्यामुळे गावातील रोहीत्रावर झालेला बिघाड दुरुस्तीसाठी अनेक तास वाट पाहावी लागत आहे तर काही वेळा ग्रामस्थांनाच दुरुस्ती करावी लागत आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता वाऱ्यामुळे 33 केव्ही मध्ये बिघाड झाल्याने विज पुरवठा खंडित झाला.शनिवारी दुपारी 4 वाजता विज पुरवठा सुरु करण्यात आला.परंतु पुन्हा दुरुस्तीचे कामे सुरु केल्याने झरीतील विज पुरवठा बंद ठेवण्यात आला.24 तास विज गायब झाल्याने 64 गावातील नागरीकांना उकाड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

error: Content is protected !!