संस्कृती आणि समाजमनाचे पोषण करणाऱ्या माय मराठीचा गौरव नेहमीच केला पाहिजे -डॉ संजय बालाघाटे
पूर्णा : श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथील मराठी विभागाने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बोलताना डॉ. संजय बालाघाटे यांनी मराठी भाषेची वाटचाल ही संपन्न आणि समृद्ध असून भाषेतून संस्कृती आणि समाज जीवन घडत असते. तसेच प्रत्येक भाषेचे एक वैशिष्ट्य असून तिचे स्वतंत्र अस्तित्व असल्याचे प्रतिपादन केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवसांब कापसे यांनी केली कार्यकामाच्या अध्यक्षस्थानी डॉ गजानन कुरुंदकर यांची उपस्थिती होती, या कार्यक्रमात डॉ राजू शेख यांनी मराठी भाषेत संत परंपरा ते आधुनिक मराठी कविता यावर विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मराठीचा वारसा समृद्ध असल्याचे सांगितले, या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा शेख तहसीन फातेमा,डॉ विजय पवार ,डॉ बी बी मुसळे, डॉ आर आर राख, प्रा उदगीरकर सर,डॉ कुलदीप कदम, प्रा लवकुशआडे यांची उपस्थिती होती ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजीव यशवंते यांनी केली तर आभार डॉ संदीप शिंदे यांनी मानले