निलेश माळवे सॉफ्टबॉल खेळात एन.आय.एस प्रशिक्षणात पहिला श्रेणीत उत्तीर्ण

0 38

सेलू / नारायण पाटील – भारतीय खेल प्राधिकरण नेताजी व नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पटियाला (पंजाब) येथे
दि. १ डिसेंबर ते २४ जानेवारी दरम्यान एसएच नॅशनल इन्स्टिट्यूट स्पोर्ट्स कोचिंग सत्रातील सहा आठवड्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम डिसेंबर 2023 – जानेवारी 2024 आयोजित करण्यात आला होता.

 

या निलेश गणेश माळवे (महाराष्ट्र )सॉफ्टबॉल यांनी प्रायोजित केलेले/येथील SAI NS NIS, पटियाला (पंजाब) मध्ये डिसेंबर 2023-JAN24 च्या स्पोर्ट्स भाग 2024 च्या महिन्यात आयोजित केलेल्या सहा आठवड्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी होऊन. एन.आय.एस. प्रशिक्षण परिक्षेत A श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केली.
प्रा. कल्पना शर्मा संचालक (शैक्षणिक) SAI NS NIS पटियाला, विनीत कुमार कार्यकारी संचालक (शैक्षणिक) SAI NS NIS पटियाला यांच्या स्वाक्षरी चे प्रमाण देण्यात आले आहे ‌. एन.आय.एस प्रशिक्षण पटियाला येथे प्रशिक्षक मुकुल देशपांडे (महाराष्ट्र)व प्रसन्न कुमार ( मध्यप्रदेश) यांचे मार्गदर्शन लाभले.

 

परभणी जिल्ह्यातील सॉफ्टबॉल चा पहिला एन.आय.एस प्रशिक्षक ठरला.
निलेश माळवे यांनी नूतन विद्यालय सेलू इयत्ता 6 वी पासून सॉफ्टबॉल खेळण्यासाठी सुरुवात केली. शालेय 14/17/19 वयोगटातील राज्य शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला ,व शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा छत्तीसगड येथे कांस्यपदक विजेता ठरला. तर संघटनेचे विविध गटातील राज्य स्पर्धेत सहभागी.

 

यशासाठी महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अध्यक्ष ना. गिरीश महाजन, राज्य सचिव डॉ.प्रदीप तळवलकर, राज्य सहसचिव प्रा. रमाकांत बनसोडे, डॉ. व्यंकटेश वांगवाड, सहसंचालक क्रीडा सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, नूतन संस्था अध्यक्ष डॉ.एस.एस.लोया, सचिव डॉ. व्हि.के. कोठेकर, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे , जयप्रकाश बिहाणी, जिल्हा सचिव प्रसनेजित बनसोडे, किशोर चौधरी,डी.डी.सोन्नेकर, प्रा.नागेश कान्हेकर, सौ.संगिता खराबे, प्रशांत नाईक,सतिश नावाडे किशोर ढोके,गणेश माळवे,संजय भुमकर , संजय महाले, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!