एचएआरसी संस्थेच्या वार्षिक सेवा अहवालाचे डॉ.राजगोपाल कालानी यांच्या हस्ते प्रकाशन
परभणी,दि 06 ः
वंचित, निराधार, अनाथ, एचआयव्ही एड्सग्रस्त तसेच बालके, किशोरवयीन मुली, निराधार महिलांच्या शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन या विषयावर काम करणारी संस्था ‘होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज’ ने 1 एप्रिल 2021 पासून ते 31 मार्च 2022 दरम्यान केलेल्या विविध समाजोपयोगी कार्यावर आधारित वार्षिक सेवा अहवाल Digital स्वरूपात तयार केला आहे. या वार्षिक सेवा अहवालाचे प्रकाशन आज दि 31 मार्च रोजी जलमित्र व प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.राजगोपाल कालानी यांनी स्वाध्यायशक्ती अभ्यासिकेत झाले.
या कार्यक्रमाच्या निमित्त दि 31 मार्च रोजी एचएआरसी संस्थेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थिती मध्ये या वार्षिक सेवा अहवालाच्या प्रकाशन संदर्भात तसेच भविष्यातील सामाजिक कार्याच्या संदर्भात बैठक स्वाध्यायशक्ती अभ्यासिकात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मागील 2021-22 मध्ये केलेल्या विविध सामाजिक उपक्रमाविषयी मंथन व आढावा घेण्यात आला. या प्रसंगी सर्वानुमते भविष्यात 2022-23 मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रम विषयी नियोजन करण्यात आले. डॉ राजगोपाल कालानी यांनी या प्रसंगी एचएआरसी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून मोलाचे मार्गदर्शन केले.
या बैठकीत डॉ जयश्री कालानी, उल्हास खंबायतकर, राजेश्वर वासलवार, गोपाळ मुरक्या, नेहा मुरक्या, डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, प्रा स्वाती कवडे, संदीप भंडे, श्रीरंग पांडे यांनी आपले विचार मांडले.
या वार्षिक सेवा अहवाल तयार करण्यासाठी आकाश गीते, प्रा स्वाती कवडे, प्रा विशाका हेलसकर व प्रा शिवा आयथळ सरांचे तांत्रिक साहाय्य लाभले.