रेल्वेच्या स्टोअर रूमला आग, महत्वाचे कागदपत्रे जळून खाक
पुर्णा / केदार पाथरकर – येथील रेल्वेच्या कम्युनिटी हाल च्या मागे असलेल्या स्टोर रूमला पहाटे अचानक आग लागली असून या मध्ये रेल्वेचे बरेच कागदपत्रे व साहित्याचे नुकसान झाले आहे.
26 फेब्रुवारी रोजी पहाटे आठ नऊच्या दरम्यान पुर्णा रेल्वे कम्युनिटी हॉलच्या मागे असलेल्या जुन्या टीसी आणि गार्ड रनिंग रूमला स्टोअर रूम म्हणून वापरत असलेल्या रूमला अचानक पणे आग लागल्याचे तेथून जाणाऱ्या काही नागरिकांना लक्षात आले त्या नंतर पुर्णा न.प.ची अग्निशामक दलची गाडी बोलविण्यात आली तो पर्यत आगीने भडका घेतला होता आग आटोक्यात आणून विझविण्यात आली या आगी मध्ये जुने महत्वाचे कागद पत्रे व साहित्य जळून खाक झाले मात्र घटनास्थळी रेल्वेस्टेशन चे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याने सदर आग अचानक लागली की लावण्यात आली या बाबत उलट सुलट चर्चा शहरातील नागरिकांत होत आहे.