राणेंना ‘बेल की जेल’

0 82

 

वृत्तसेवा – गजानन जोशी – गत काही दिवसांपासून राज्यात चालू असलेल्या सत्ताधारी व विरोधक यांच्या चिखलफेकीच्या राजकारणात आमदार नितेश राणे रडारवर आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ‘म्याव – म्याव’ आवाज काढत मंत्री आदित्य ठाकरे यांना हिणविलेले व नेहमीच आपल्या कोकणी शैलीने राज्याला खुसखुशीत टीका करत असलेले युवा व्यक्तिमत्त्व अशी ओळख आहे,परन्तु काही दिवसांपूर्वी संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात आ.नितेश राणे यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेवत त्यांना सूडबुद्धीने त्रास देण्याचा प्रकार राज्यात चालविला जातो आहे का? राज्यातील विरोधाच्या फेऱ्यात राणे कुटुंबीय अडकले जाणार का?

या सर्व प्रकरणात (दि.२९ डिसेंबर) रोजी न्यायालयात सरकारी वकील व राणे वकील यांच्यात खंडाजंगीचा युक्तिवाद झाला. यात निर्णय उद्या होणार असल्याने आ.नितेश राणेंना “बेल की जेल” याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे…

 

सूडबुद्धीने राजकारण चालविले जाते आहे,राणे कुटुंबियांना त्रास देण्याचा डाव हा सत्ताधाऱ्यांकडून रचला जातो आहे.
-प्रविण दरेकर, विपक्ष नेते – वि.परिषद,महाराष्ट्र

error: Content is protected !!