माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त १११ वृक्ष लागवडीचा संकल्प

जागतिक पर्यावरण दिनी बेल वृक्ष लावून केला शुभारंभ

0 114

 

 

सेलू / नारायण पाटील – माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त १२ औगस्ट पर्यंत बंडू देवधर मित्रमंडळाचा वतीने शहरात १११ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

 

 

या वृक्ष लागवडीचा शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनी दि ५/६/२३ सोमवार रोजी शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या शुभहस्ते बेल वृक्ष लागवड करून करण्यात आला.

 

यावेळी मंदिर चे पुजारी मनोज मंडलिक, प्रदीप साळेगावकर,संतोष कुलकर्णी ,मोहन खापरखुंटीकर , नारायण पाटील अविनाश शेरे ,डॉ अनुराग जोगदंड ,डॉ किशोर जवळेकर ,मनोज दीक्षित ,निशिकांत पाटील, उमेश विडोळीकर ,अभिजित फोफसे ,ऍड शुभम दिग्रसकर , पांडुरंग कावळे ,कार्यक्रमाचे आयोजन बंडू देवधर ,सुदर्शन तांदळे ,आशिष जटाळ अभय ढवळे ,विलास काळे आदींची उपस्थिती होती .

error: Content is protected !!