समीर दुधगावकर यांनी दिल्या मुस्लीम बांधवाना शुभेच्छा
परभणी,दि
हिंदु मुस्लीम समाजाची एकता अखंडीत राहुन एकमेकात प्रेम,आपुलकी कायम राहीली पाहीजे असे प्रतिपादन परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी केले.
परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी आज गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी रमजान ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदान येथे जाऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. ही ईद धार्मिक एकता व परस्पर स्नेहभावाला वृद्धिंगत करणारी ठरो अशा शब्दात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या,
मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण असलेला रमजान ईद आज सर्वत्र उत्साह साजरी झाली. शहरात ईदगाह मैदानावर येथे सामूहिक नमाज पठण करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी ईदगाह मैदान येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील दुधगावकर यांच्या शुभेच्छांचा प्रेमाने स्वीकार करत आभार व्यक्त केले.यावेळी दुधगावकर यांच्यासमवेत सय्यद नवाजीश, प्रभाकर घाटगे, महेंद्र जंगम उपस्थित होते.