विना गणवेश साजरा करावा लागणार विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिवस

शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे गणवेशचा निधी रखडला

0 77

 

पूर्णा, सुशिलकुमार दळवी – शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणा मुळे गणवेशचा निधी रखडल्याने तालुक्यातील जिप शाळेच्या विद्यार्थीयाना आता पर्यत गणवेश न मिळाल्याने यंदा स्वातंत्र्य दिवस विना गणवेशात साजरा करावा लागणार की काय?आशा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या कडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोले जात आहे.

 

पूर्णा तालुक्यात एकूण जिल्हा परिषदेच्या 111 शाळा आहे या शाळा मध्ये या वर्षी मुली 6728,अनसुचित जाती 1229,अनुसूचित जमाती 77,दारिद्र्य रेषा खालील 880, असे एकूण 8914 .पात्र विद्यार्थीयांचा 5348400 रु निधीची मागणी करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा संकटात दोन वर्ष सर्व शाळा बंद होत्या परंतु आता कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सर्व निर्बंध उठवून 15 जून पासून शैक्षणिक वर्ग सुरू केल्याने सर्व शाळा पूर्व पदांवर सुरू झाल्या आहे.आणि शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थीयाना सर्व पुस्तके व गणवेश देण्यात येते.

 

पुर्वी गणवेशचा निधी समग्र योजना अंतर्गत शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या खात्यात जमा करण्यात येत होते परंतु या वर्षी पीएफएमएस प्रणाली द्वारे शालेय व्यवस्थापण समितीच्या खात्यात गणवेशचा निधी जमा करण्यात येणार होता.परंतु शाळा सुरू होऊन आज तबबल दीड महिना उलटा तरी ही निधीचा ठाव ठिकाणा नाही.या आदी ही परभणी जिल्हा शिक्षण विभागाने 26 जानेवारीलाही विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा करून जाचक अटी नियम घातल्याने गणवेश खरेदी बाबत धादली उडाली होती. तेव्हा ही शालेय विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याने जिल्हा शिक्षण विभागाने केलेल्या 26 जानेवारीत विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या घोषणा हवेत राहिल्या होत्या.आता या वर्षीही जिल्ह्या शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठय पुस्तके आणि शालेय गणवेश देण्यात यईल अशी घोषणा करून ही आज शाळा उघडून दीड महिना उलटला आहे आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस उंबरठ्यावर आला असून सुद्धा पात्र शालेय विद्यार्थ्यांना गणवेशचा निधी शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या खात्यात जमा न झाल्याने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाला नसल्याने येणारा स्वातंत्र्य दिवस विद्यार्थ्यांना गणेवश विना साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मुळे शिक्षण विभागाने या कडे जातीने लक्ष घालून त्वरित गणवेशाचा निधी व्यवस्थापण समितीच्या खात्यात जमा करण्याची मागणी पुढे येत आहे

error: Content is protected !!