फोनवर बोलताना असा आवाज येतोय ? व्हा अलर्ट, रेकॉर्ड होतोय तुमचा कॉल

1 225

फोन कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीर नाही. अनेकदा महत्वाच्या आणि खाजगी विषयांवर फोनवर बोलत असताना कुणी कॉल रेकॉर्ड तर करणार नाही अशी शंका अनेकांच्या मनात असते. बोलत असताना तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे जर माहित करायचे असेल तर, त्यासाठी सोप्या ट्रिकची मदत घेता येईल. जर तुम्हाला कॉलच्या मधोमध सतत बीपचा आवाज ऐकू येत असेल, तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. जर कोणी तुमचे कॉल रेकॉर्ड केला तर ते कायद्याचे उल्लंघन मानले जाते. विशेष म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करू शकता. तसेच, तुम्ही त्याच्याकडून नुकसानभरपाई घेऊ शकता.Google ने सर्व Call Recording Apps केले आहेत. हे सर्व बेकायदेशीर आहेत. याचा सरळ अर्थ असा की, प्ले स्टोअरमधील कोणतेही अॅप कॉल रेकॉर्डिंग फीचरसह येत असल्यास, त्यावर बंदी घालण्यात आली आहे.असे असले तरीही फोनमध्ये दिलेले इन-बिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर अजूनही वापरले जाऊ शकते. याद्वारे तुमचे कॉल रेकॉर्डही केले जाऊ शकतात.
कॉल रेकॉर्डिंगच्या विरोधात Google
Google गेल्या काही वर्षांपासून कॉल रेकॉर्डिंग अॅप्स आणि सेवांच्या विरोधात आहे. कंपनीच्या मते, कॉल रेकॉर्डिंग हे युजर्सच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे. या कारणास्तव, जेव्हा कधी कोणाचा कॉल त्यांच्या स्वत: च्या डायलर अॅपमध्ये रेकॉर्ड केला जातो तेव्हा त्यात एक स्पष्ट मेसेज ऐकू येतो की, हा कॉल आता रेकॉर्ड केला जात आहे. हे कॉलर आणि रिसीव्हर दोघांनाही ऐकू येते.

error: Content is protected !!