तहसिलदारांनी केला वाळु माफीयांचा पाठलाग,नालीत अडकले एक ट्रॅक्टर,दुसरे पळवले
रमेश बिजुले
पाथरी,दि 24 (प्रतिनिधी) गुंज येथे वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर चालू असल्याकारणाने पाथरीचे तहसीलदार एस.एन.हदेश्वर हे कारवाईसाठी एका पोलीस कर्मचाऱ्यासहित गुंज येथे दाखल झाले होते. त्यावेळी वाळूची अवैध वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडण्यात आले यावेळी उपस्थित वाळू माफियांकडून तुम्ही आमच्याकडून हप्ता घेता आणि तुमची तुम्हीच आमचे वाहने पकडता. असा गोंधळ करत वाळू माफियांनी तहसीलदार यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर बातमी अशी की मौजे गुंज येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्याने पाथरी तहसीलचे तहसीलदार एस एन हदेश्वर एका पोलीस कर्मचाऱ्यासहित गाडीचे चालक यांच्यासह गुंज येथे दाखल झाले त्यांनी ट्रॅक्टर ही पकडले व दुसऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे लागल्याने ट्रॅक्टरचा ड्रायव्हर घाबरल्याने त्यांनी तो ट्रॅक्टर एका घरावरती आढळला यावेळी गावातील काही वाळूमाफिया त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी उपस्थित पोलीस कर्मचारी व तहसीलदार यांना तुम्हीच हप्ते घेता आणि तुम्हीच आमच्या वाहनावर कारवाई करता का असे म्हणत पोलीस अधिकारी व तहसीलदार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत पकडलेला पहिला ट्रॅक्टर पळवण्यात यशस्वी झाली परंतु जो ट्रॅक्टर घरावर आढळला होता त्या ट्रॅक्टरचे एक चाक नालीत अटकल्याने व नागरिकांचा जमाव असल्याने तो ट्रॅक्टर वाळू माफियांना पळवता आला नसल्याने तहसीलदार यांनी तो ट्रॅक्टर पकडून पाथरी पोलीस स्टेशन मध्ये आणून लावून पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन व तहसील ला सादर करण्यात आलेला आहे.