भव्य आतषबाजीने पाथरीच्या उरूसास सुरुवात
पाथरी, प्रतिनिधी – शहरवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या शरिफ दरगाह सय्यद सादत साहब (रहे) यांच्या १०८ व्या उरुसाची सुरुवात रविवार ( ता. 29 ) रात्री ९ वाजता भव्य आतषबाजीने करण्यात आली.
जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या या आतषबाजीचे उदघाटन माजी नगराध्यक्ष जुनेदखान दुर्रांनी यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी उर्स कमेटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक किरण भाले, माजी नगराध्यक्ष मोईज मास्टर, नितेश भोरे, कलीम अन्सारी,अनिल पाटील, डॉ, अतुल भाले, हबीब अन्सारी, नारायण पितळे,रफिक अन्सारी,असेफ अन्सारी, अहेमद अतार, सगीर अन्सारी, रज्जाक कुरेशी,आतिषबाजी कमिटीचे अध्यक्ष महेमुद अत्तार व अल्ताफ अन्सारी यांच्या सह उर्स कमेटी सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संखेने शहरातील नागरीकांची उपस्थिती होती. या वेळी आर्धातास विविधरंगी आतषबाजीचा पाथरी शहरवाशीयांनी मनमुराद आनंद लुटला, आतषबाजी नंतर उरूसात आलेल्या मिना बाजाराचे उद्घाटन दुर्राणी यांचे हस्ते झाले, रात्री दहा वाजता दर्गाच्या वतीने मानाची संदल काढण्यात आली.