महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार डॉ. संजय बोरुडे यांना जाहीर
नागपूर : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार अहमदनगर येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय बोरुडे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या साहित्य क्षेत्रातील एकूण योगदानाबद्दल दिला जात आहे .
डॉ. संजय बोरुडे यांची १९ पुस्तके प्रसिद्ध असून ते मराठी शिवाय हिंदी आणि इंग्रजीतही लेखन करतात. मुंबई विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कविता समाविष्ट असून नागपूर विद्यापीठात कथा आहे.
कथा / कविता / कादंबरी / समीक्षा / ललित आदि सर्व प्रकारचे लेखन त्यांनी केलेले असून ‘नेवासा ‘ या गावाचा दीड लाख वर्षांपासूनचा इतिहास त्यांनी लिहिला असून मराठीतील हा एकमेव ग्रंथ आहे.
अहमदनगरच्या दृष्टीने ही गोष्ट गौरवाची असून राज्यपातळीवर दिल्या
जाणारा हा पुरस्कार सोहळा येत्या ३१ मार्च रोजी सीताबर्डीच्या मधुरम् सभागृहात संपन्न होत आहे .