नवीन आर्थिक वर्षात महत्त्वाचे बदल होणार,सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

2 301

मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तर त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. आर्थिक वर्ष २०२४-२५ म्हणजे १ एप्रिलपासून होणाऱ्या या बदलांबद्दल तुम्हाला आधीच माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे.

 

येत्या १ एप्रिल रोजी फास्टॅगशी संबंधित नियमही बदलत आहेत. ग्राहकांनी त्यांच्या कारच्या फास्टॅगचे बँक केवायसी पूर्ण केले नाही तर नवीन आर्थिक वर्षात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३१ मार्चपूर्वी फास्टॅग केवायसी पूर्ण करा, अन्यथा बँक तुमचे फास्टॅग खाते निष्क्रिय करेल किंवा ब्लॅकलिस्ट करेल आणि असे झाल्यास फास्टॅग खात्यातील शिल्लक वापरू शकणार नाही.

 

ईपीएफओही १ एप्रिलपासून नवीन नियम लागू करणार
ईपीएफओही १ एप्रिलपासून नवीन नियम लागू करणार आहे. यानुसार आता नोकरी बदलताना पीएफ शिल्लक ट्रान्सफर करण्याची गरज नसेल. जुन्या पीएफची शिल्लक ऑटो मोडमध्ये हस्तांतरित केली जाईल. तसेच आतापर्यंत नोकरी सोडल्यानंतर युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असूनही, पीएफ खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आधी विनंती करावी लागत होती.

 

 

NPS साठी नवीन नियम

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) NPS गुंतवणूकदारांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी द्विस्तरीय सुरक्षा प्रणाली लागू करणार आहे. या अंतर्गत टू वे ऑथेंटिकेशन आधारित प्रमाणीकरण सुरू केले जाईल. हे सर्व पासवर्ड-आधारित वापरकर्त्यांसाठी अनिवार्य असेल. नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे.

 

 

SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल

SBI कार्डने जाहीर केले आहे की काही विशिष्ट क्रेडिट कार्डांद्वारे भाडे देयांवर रिवॉर्ड पॉइंट्स 1 एप्रिल 2024 पासून बंद होतील. यामध्ये AURUM, SBI Card Elite, SBI Card Elite Advantage, SBI कार्ड पल्स यांचा समावेश आहे. त्याच वेळी काही क्रेडिट कार्डांवर भाड्याच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट मिळणे 15 एप्रिल 2024 पासून बंद होईल.

 

 

OLA  मनी वॉलेट

1 एप्रिल 2024 पासून OLA  मनी वॉलेटकडून प्रति महिना 10,000 रुपयांच्या कमाल वॉलेट मर्यादेसह लहान PPI (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट) वॉलेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून याची माहिती दिली आहे.

 

 

ICICI बँक लाउंज अॅक्सेस

ICICI बँकेने कॉम्प्लिमेंट्री एयरपोर्टच्या लाउंज अॅक्सेस अटींमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिमाहीत ग्राहकांना यासाठी किमान 35,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यानंतरच पुढील तिमाहीसाठी कॉम्प्लिमेंट्री एयरपोर्टच्या लाउंज अॅक्सेस अनलॉक होईल.

 

येस बँक लाउंज एक्सेस बेनिफिट्स

येस बँकेने नवीन आर्थिक वर्षापासून आपल्या देशांतर्गत लाउंज एक्सेस बेनिफिट्स धोरणांमध्ये बदल केले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, पुढील तिमाहीत सर्व ग्राहकांना लाउंज एक्सेस बेनिफिट्स मिळविण्यासाठी चालू तिमाहीत किमान 10,000 रुपये खर्च करावे लागतील.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत सरकारने अनेकवेळा वाढवली असून आता या कामासाठी ३१ मार्च २०२४ अंतिम तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेपूर्वी पॅन कार्ड आधार क्रमांकासही लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द केले जाऊ शकते. पॅनकार्ड रद्द झाल्यास अनेक महत्त्वाच्या गोष्टी शक्य होणार नाहीत. एवढेच नाही तर पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी १,००० रुपये दंडही भरावा लागेल.

 

 

एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती
सरकार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करते. देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. हे पाहता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता कमी आहे.

error: Content is protected !!