राष्ट्रवादीचे ‘हे’ दोन खासदारही अजित पवारांसोबत; शरद पवारांना मोठा धक्का

0 322

 राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये भूट पडली आहे. अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे  आणि अमोल कोल्हे (MP Sunil Tatkare and Amol Kolhe in Raj Bhavan) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का (This is a big blow to Sharad Pawar) मानला जात आहे.

 

राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेताचा राजीनामा दिला त्यानंतर राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा (Ajit Pawar has the support of 25 MLAs) असल्याचे पत्र असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावेळी एकूण 9 राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेणारअसल्याचं सांगितलं जात आहे. तर आता राष्ट्रवादीचे दोन खासदार देखील अजित पवारांसोबत गेल्याने त्यांना देखील केंद्रात काही जबाबदारी मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
error: Content is protected !!