केंद्र सरकार अर्थसंकल्पात महिलांना गिफ्ट देणार ?
- यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार महिलांना दिलासा देण्याची शक्यता आहे. भारताचा अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यासाठी आता फक्त २ दिवस उरले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अंतरिम अर्थसंकल्प २०२४ कडून महिलांना विशेष अपेक्षा आहेत. विशेषत: नोकरदार महिलांना देशाच्या महिला अर्थमंत्र्यांकडून अनेक अपेक्षा आहेत. काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला करदात्यांच्या ज्या सुविधा हिरावून घेतल्या होत्या, त्या पंतप्रधान मोदी परत करणार करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महिलांना मोदी गिफ्ट देण्याची शक्यता
यंदा सरकारचा नारा म्हणजे महिलांना मोदी सरकार गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सुमारे १२ वर्षांपूर्वीपर्यंत भारतात महिलांसाठी वेगळी कर रचना होती. महिलांसाठी प्राप्तिकर भरणेतील मूळ सूट मर्यादा पुरुषांपेक्षा किंचित जास्त होती. म्हणजेच महिलांनी पुरुषांपेक्षा कमी कर भरावा लागत होता. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात सरकारने २०१२-१३ या आर्थिक वर्षापासून ही पद्धत रद्द केली. पुरुष आणि महिला दोघांसाठी समान प्राप्तिकर रचना लागू करण्यात आली. तेव्हापासून महिलांसाठी स्वतंत्र प्राप्तिकर रचना नाही आणि महिलांना कोणत्याही विशेष प्राप्तिकर सवलतीचा लाभ मिळत नाही. मात्र, यावेळी महिलांसाठी वेगळी प्राप्तिकर रचना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महिलांसाठी वेगळी प्राप्तिकर रचना असणार?
मोदी सरकार ही सुविधा महिलांसाठी म्हणजेच स्वतंत्र प्राप्तिकर रचना आणू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार महिलांसाठी वेगळी कर रचना राबवू शकते. महिला करदात्यांना नवीन कर प्रणालीमध्ये ८ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. म्हणजेच त्यांना बजेटमध्ये वेगळ्या आणि अधिक सवलती मिळू शकतात. सध्या नवीन कर प्रणालीमध्ये ७ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागत नाही. आता सरकार महिलांसाठी ते ८ लाख रुपये करू शकते. म्हणजेच नवीन कर स्लॅबमुळे महिलांना ८ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.