लोक कवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्काराची निवड समिती जाहीर..

0 25

रामभाऊ आवारे निफाड
लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार महाराष्ट्रातील दर्जेदार कविता संग्रहाला दिला जातो. हा पुरस्कार महाराष्ट्रातील नामवंत कवी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहासकार शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांनी संयोजित केलेला आहे. मराठी भाषेत त्या वर्षात प्रकाशित झालेल्या सर्वोत्तम कविता संग्रहाला 11000 रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ अशा स्वरूपात या पुरस्काराचे वितरण केले जाते.
या पुरस्काराची निवड अतिशय निपक्षपाती व्हावी. म्हणून यासाठी कवितेची सखोल जाणीव असणारे दर्जेदार साहित्यिकांची एक निवड समिती केली जाते. 2023 च्या पुरस्काराच्या निवड समितीचे अध्यक्ष पद महाराष्ट्रातले नामवंत कवी साहित्यिक प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यासोबत नव्या पिढीतील दर्जेदार लेखक कवी ज्ञानेश उगले, सागर जाधव जोपुळकर व जयश्री वाघ यांची या समितीचे सन्माननीय निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार लोकांच्या निवड समितीकडून ज्या पुस्तकाची निवड केली जाईल .त्या संग्रहास लवकरच लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार अतिशय वेगळ्या अशा समारंभात सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
निवड समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण महाडिक यांचा कुणब्याच्या कविता हा कवितासंग्रह प्रकाशित असून त्यांना अनेक राज्य पुरस्कार प्राप्त आहे. त्यांच्या कविता अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात अभ्यासल्या जातात. निवड समितीचे निमंत्रित सदस्य असणारे ज्ञानेश उगले हे दर्जेदार नव्या पिढीचे ग्रामीण कवी व नामवंत पत्रकार आहे. त्यांचा मातीची मुळाक्षरे हा कविता संग्रह प्रकाशित असून त्यास अनेक पुरस्कार प्राप्त आहे.सागर जाधव जोपुळकर हे नव्या पिढीचे आघाडीचे कवी असून अनेक साहित्यिक उपक्रम ते घेत असतात. जयश्री वाघ यांचे नाव गझलमध्ये महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांचा नीलमोहर हा कवितासंग्रह प्रकाशित असून त्याला अनेक राज्य पुरस्कार प्राप्त आहे.
आतापर्यंत या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून शंभर पेक्षा जास्त कविता संग्रह प्राप्त झाले आहे. 5 फेब्रुवारी पर्यंत पुस्तक पाठवण्याची मुदत आहे यानंतर वरील समितीकडे हे पुस्तके दिले जातील व लक्ष्मण महाडिक यांची समिती लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्काराची घोषणा करील.अशी माहिती या पुरस्काराचे संयोजक प्रा. संदीप जगताप व प्रा. जावेद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

error: Content is protected !!