अंबरनाथच्या कोव्हिड 19 सेंटर व विलगीकरण कक्षांची पाहणी करुन आमदार डॉ.बालाजी किणीकर ह्यांनी घेतला आढावा

0 120

अंबरनाथ ,जाफर वणू – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपरिषदे मार्फत पश्चिम येथील “दंत महाविद्यालय कोव्हिड 19 रुग्णालय” तसेच कोरोना संशयित रुग्णांसाठी “औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलांचे वसतिगृहात सुरू करण्यात आलेले विलगिकरण कक्ष व ऑरचिड बिल्डिंग” मधिल विलगीकरण कक्षाची शनिवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर ह्यांनी अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्यासह पाहणी करून येथील व्यवस्थेचा आढावा घेतला.

तसेच सद्यस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात 110 कोरोना संशियत रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या प्रसंगी आमदार डॉ.बालाजी किणीकर ह्यांनी येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांशी ही संवाद साधत उपचारा दरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

या पाहणी दरम्यान येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांकरिता करण्यात आलेल्या ऑक्सिजनची व्यवस्था, पाण्याची व जेवणाची व्यवस्था या आवश्यक बाबींचा आढावा घेतला. तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना दिल्या.

सिप्लातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला 3 कोटी रुपयांची मदत

error: Content is protected !!