अं.न.प. माजी नगरसेवक उमेश गुंजाळ ह्यांचातर्फे थॅलेसिमिया मुलांसाठी “रक्तदान शिबीर” संपन्न

0 215

अंबरनाथ ,जाफर वणू –  अंबरनाथ शहरातील पूर्वेकंडील शिवसेना शाखा ग्रीन सिटी चौक येथे अं.न.प माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदादा साहेबराव गुंजाळ ह्यांचातर्फे थॅलेसिमिया मुलांसाठी ‘रक्तदान शिबीराचे’ आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या आदेशाने युवानेते आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार डॉ. बालाजी किणीकर ह्यांच्या नेतृत्वाखाली तसेच ह्यांनी केलेल्या आवाहनानुसार अं.न.प माजी नगरसेवक उमेशदादा साहेबराव गुंजाळ ह्यांनी रविवार दि. 19 जुलै 2020 रोजी शिवसेना शाखा ग्रिनसिटी चौक अंबरनाथ पूर्व येथे थॅलेसिमिया मुलांकारिता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कारण थॅलेसिमिया असलेल्या मुलांना स्वतः शरीरात रक्त तयार होत नाही म्हणून प्रत्येक १२ ते १५ दिवसांनी त्यांना रक्ताची गरज असते. त्याकरीता “सर्वोदय हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँक घाटकोपर” अशा १३० मुलांना नियमितपणे रक्तपुरवठा करत असतात.

परंतु लॉकडाउन दरम्यान या मुलांना रक्तपुरवठा मिळण्यास खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे या मुलांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान मिळावा ही गंभीर बाब लक्षात घेत उमेशदादा साहेबराव गुंजाळ ह्यांनी परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास रक्तदातांनी चांगला प्रतिसाद दिला. याप्रसंगी समाजसेवक सचिन गूंजाळ, संजय मेटकर, धर्मेश मेहता, प्रशांत महाडिक, स्वप्निल चौधरी, आहुजा, जयश्री अमरेंद्र मांडे ह्यांच्यासह आदि मान्यवर उपस्थितीत होते. तसेच “सर्वोदय हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँक घाटकोपर” च्या डॉक्टरांनी उमेश गुंजाळ यांचे आभार व्यक्त केले.

अंबरनाथ शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात आज रुग्णांची संख्या सुमारे 3100 हून अधिक आहे. कारण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमूळे सर्वच नोकऱ्या व काम धंदे बंद ठेवली होती. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. ती पूर्वपदावर येण्याकरीता सरकारने काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकांना नोकरीला व व्यवसाय ह्याकडे वळावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परंतु आता बाहेरून घरी येण्याआधीच आपले हात सेनिटाइझ करूनच आपल्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करीत घरात जावे. जेणेकरून आपण व आपल्या कुटूंबियांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून रक्षण होईल. याकरीता अंबरनाथ वॉर्ड क्र. 39 व 41 मधील प्रत्येक कॉम्प्लेक्स आणि हौ. सोसायटींना ऑटोमॅटिक सेनिटायजर स्टँडचे वाटप करण्यात आल्याचे अं.न.प माजी नगरसेवक उमेश गुंजाळ ह्यांनी सांगितले आहे.

लॉकडाउन काळात सर्वात प्रथम वॉर्ड क्र. 39 व 41 मधील प्रत्येक कॉम्प्लेक्स आणि हौ. सोसायटी मध्ये किटकनाशक व सॅनिटायझर फवारणी, अंबरनाथ बदलापुर शहरात गोरगरीबांना (रासन) जिवनावश्यक वस्तुचे वाटप, सॅनिटायझर मास्क वाटप, मोफत आरोग्य तपासणी, मोरिवाली पाडा गांव, चिखलोली पाडा गांव, हनुमान मंदिर जवळ, विटभट्टी, फॉरेस्ट नाका, ठाकुरपाडा अश्या अनेक ठिकाणी रोजी सकाल व संध्याकाळी जेवणाचे वाटप करण्यात आले. हे कार्य करते वेळी उमेशदादा ह्यांनी आपल्या जिवाची व कुटुंबियाची पर्वा न करता नागरिकांच्या हिताकरीता काही ना काही उपक्रम राबवित असतात.

‘डिजीटल स्त्री शक्ती’ : 5000 तरुणी होणार ‘सायबर सखी’

error: Content is protected !!