अन्याय अत्याचार निर्मूलन समिती शिर्डी शहर अध्यक्ष पदी आकाश जाधव यांची निवड

0 129

शिर्डी, प्रतिनिधी – अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेच्या जिल्हातील कार्यकारणी समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव व अहमदनगर जिल्हा अध्यक्षा सौ. रमादेवी धिवर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व समितीचे अहमदनगर युवक जिल्हा अध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेत्तृत्वाखाली शिर्डी शहर युवक अध्यक्ष पदी आकाश उर्फ राहुल जाधव यांची निवड करण्यात आली. तेव्हा नियुक्ती पत्र देवुन जबाबदारी निश्चित करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम घेता येत नसल्याने ईमेलद्वारे नियुक्ती पत्र पाठविण्यात आले. वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदारीचे काम एकनिष्ठेने करणार असल्याचे शिर्डी शहर अध्यक्ष आकाश उर्फ राहुल यांनी सांगितले. अन्याय व अत्याचारा विरोधामध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशांनी समितीच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन समिती युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष पारखे यांनी यावेळी सांगितले.

कंधारमध्ये ११ जणांना लागण; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंधार शंभर टक्के बंद
वनामकृविचा सुरक्षा यंत्रणेवर लाखोंचा खर्च; महागड्या कंपनीसोबत अर्थपूर्ण व्यवहार
शेत मालाला पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्राध्यापकाचा प्रयत्न !



error: Content is protected !!