आदिवासी विभागातील विशेष शिक्षक पद भरती करण्यात यावी
सुरगाणा, दौलत जाधव – आदिवासी विकास विभागातील आज रोजी शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पद भरती तात्काळ करण्यात यावी.यासाठी आज रोजी अनेक भावी शिक्षक शासनाच्या नियमानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.परंतु आज रोजी अनेक भावी शिक्षक बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत.
हे निवेदन सादर करण्यासाठी माननीय नरहरी झिरवाळ साहेबांकडे आदिवासी विकास विभागातील विशेष शिक्षक पद भरती करण्यासाठी सर्वांनी मिळून आग्रह धरला होता.तसेच दुसरी शिक्षक अधियोगीता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात यावी.
त्या वेळी माननीय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांनी सांगितले की शिक्षक पद भरती करण्यासाठी शासन दरबारी दिलेल्या शिक्षक भरती संधर्भात त्वरीत दखल घेतली जाईल. असे माननीय श्री.झिरवाळ साहेब यांनी आश्र्वासन दिले.
निवेदन सादर करण्यासाठी उपस्थित. गुंबाडे मनोहर. जाधव दौलत. अर्जुन भोये. अनिल भुसारे. हरिष अलबाड पुंडलिक टोपले. चंद्रशेखर धूम. रमेश जोपले . हेमंत चौधरी. रंजना गावित. परशुराम बिरारी. सह आदी पात्र धारक विध्यार्थी उपस्थित होते.