इंदापूर येथे ३२ किलो गांजा जप्त

1 207

डी वाय एस पी श्री शिरगावकर व दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण यांची कारवाई
पुणे,प्रतिनिधी –  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह इंदापूर परिसरात गस्त करीत असताना दहशतवाद विरोधी पथकाचे किरण कुसाळकर यांना खबऱ्या द्वारे बातमी मिळाली की दोन इसम पुणे सोलापूर रोड वरून इंदापूर च्या दिशेने दुचाकीवर गांजा घेऊन येणार आहेत.

मिळालेली ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी बारामती उपविभागाचे डीवायएसपी श्री नारायण शिरगावकर यांना कळविली त्यावेळी श्री शिरगावकर हे जिल्ह्याचे रात्रगस्त अधिकारी म्हणून कर्तव्यावर होते. त्यांनी तात्काळ इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे व व स्टाफ तसेच दहशतवाद विरोधी पथकाच्या स्टाफ यांच्या मदतीने इंदापुर मध्ये नाकाबंदी केली. या नाकाबंदी मध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन इसम 32 किलो गांजा दुचाकीवर घेऊन मिळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री नारायण शिरगावकर, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सारंगकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे व स्टाफ तसेच पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार विश्वास खरात, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत व अरुण पवार या पथकाने केली.

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे अमर, अकबर अँथनी-रावसाहेब दानवे

error: Content is protected !!