ऊस उत्पादक शेतकऱ्यांना डीसीसी बँकेचा पीक कर्ज देण्यास नकार

0 146

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली

माजलगांव,प्रतिनिधी :- सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत असलेला राजेगाव सह परिसरातील शेतकरी पिक कर्ज मिळवण्यासाठी बँकेचे खेटे मारताना पाहायला मिळत आहे. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व बँकांना आदेश दिले होते की शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी छळू नका तसेच त्यांना कागदपत्रांसाठी खेटे मारत लावू नका. परंतु मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाला बँक कर्मचाऱ्यांनी एक प्रकारे केराची टोपली दाखवण्याचे काम केले आहे. एका कागदासाठी शेतकऱ्याला बँकेच्या दारात खेटे मारायला लागत आहेत.
खरीपाच्या पेरण्या होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्यापही शेतकऱ्याचा पिक कर्ज मिळालेला नाही. पिक कर्ज वाटपाबाबत बँका उदासीन का..? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

आधीच शेतकरी सोयाबीन च्या बियाण्यात भेसळ आल्याने सोयाबीनची दुबार पेरणी करण्याच्या संकटात असताना देखील शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याची अवहेलना केल्यासारखेच आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कडून अतिशय धिम्या गतीने पीक कर्ज वाटप सुरू आहे. कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता पीक कर्ज वाटप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत पीक कर्ज वाटपाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी पीक कर्ज च्या अर्जाची मागणी करावी असे सेवा सहकारी सोसायटी संस्थेमार्फत शेतकऱ्याला कळवण्यात आले आहे. परंतु यात उसासाठी पीक कर्ज मागणी करुन नका असेही ऐकायला मिळत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टाकरवण च्या मॅनेजर शी संपर्क साधला असता आम्ही सोयाबीन व कापूस या पिकासाठी हेक्टरी ५७ हजार रुपये एवढे वाटप करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राजेगांव सहपरिसर उसाच्या पिकांमुळे ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो तरी पण या भागातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून उसाच्या पिकावर कर्ज न देऊन एक प्रकारे अन्याय केला जात आहे. यात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जातीने लक्ष घालून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देऊन सहकार्य करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत कापूस व सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी 57 हजार रुपये एवढे वाटप करणार आहोत आम्हाला उसाच्या डिमांड याबाबत कसलीही सूचना मिळाल्या नाहीत.
मा. घोरपडे
बँक मॅनेजर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टाकरवण.

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

 

error: Content is protected !!