कंपन्यानी कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक सूचनांचे तंतोतंत पालन करा:- प्रांत राजेंद्रकुमार जाधव
कापूरहोळ,विठ्ठल पवार – अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी उद्योग धंदे सुरू राहण्यासाठी प्रशासन भर देत आहे. मात्र शासनाने दिलेल्या सूचनांचे काही कंपनीकडून पालन होताना दिसत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढीला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कंपनीकडून योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करत शक्य असल्यास हॉटस्पॉट भागातून येणाऱ्या कामगारांना ३१जुलै पर्यंत सुट्टी देण्याची द्यावी व कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन भोरचे प्रांतधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी कंपनीच्या मालक आणि व्यवस्थापकाना दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नसरापूर ( ता. भोर ) येथील कुंभारकर मंगल कार्यालयात शिंदेवाडी ते सारोळा महामार्गावरील हद्दीतील सर्व कंपनीच्या मालक आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांतधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी प्रत्येक कंपनीने कामगाराची माहिती, कामगार येणारे जाणारे ठिकाणची माहिती, कामगाराची काळजी कशी घ्यावी आदी सूचना देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, तालुका आरोग्य अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे, नसरापूरचे मंडलाधिकारी श्रीनिवास कंड्डेपल्ली, तलाठी जे. के. बरकडे यांच्यासह प्रत्येक कंपनीचे व्यवस्थापक अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव म्हणाले की, भोर तालुक्यातील एका कंपनीने बाधित व्यक्तीची माहिती लपविल्याने आजही साखळी तुटत नाही. संबधित कंपनीवर गुन्हा दाखल केला असून अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नका. भोर आणि वेल्ह्यात कोरोनावर मात मिळविण्यात यशस्वी झालो होतो, परंतु याचे लोकांना गांभीर्य नाही. प्रामुख्याने हा संसर्ग हा पुणे आणि मुंबईचे कनेक्शन सतत जोडले गेल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चिंता व्यक्त करत सध्या कोरोना होण्याची भितीपेक्षा रुग्णाला उपचारासाठी जागा कमी पडत आहे. यासाठी कोविड सेंटरसाठी आता मंगल कार्यालयही ताब्यात घेणार असल्याचे सांगत पुण्यावरून येणाऱ्या कामगारांना शक्य असेल तर ३१ जुलै पर्यंत सुट्टी द्यावी तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील एकही कामगार हा कामावर आला नाही पाहिजे. कामगारांचे विलगीकरण करणे आवश्यक असून प्रत्येक कामगाराकडून कोरोनाबाबत काळजी घेण्याचे हमीपत्र कंपनीला द्यावे लागणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.