केकरजवळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष लाडाने यांची बिनविरोध निवड

1 259

परभणी,दि 11 (प्रतिनिधी)ः
केकरजवळा ता.मानवत येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनलचे संतोष रावसाहेब लाडाने तर उपसरपंचपदी कांताबाई दत्तराव जामकर यांची बिनविरोध  निवड झाली आहे.
मानवत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या केकरजवळा येथील ग्रामपंचायत निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेले युवा नेते संतोष लाडाने यांच्या नेतृवाखालील पॅनलचे 11 पैकी  सात सदस्य निवडुण आले आहेत.दि.9 रोजी सरपंच-उपसरंपच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.यात संतोष रावसाहेब लाडाने तर उपसरपंचपदी कांताबाई दत्तराव जामकर यांची बिनविरोध  निवड झाली आहे.निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी संतोष लाडाने व अन्य सदस्यांचा सत्कार केला आहे.यावेळी नुतन सदस्य कविता विठ्ठलराव लाडाने,कविता चंद्रकांत गवळी,सारीका संतोष लाडाने,सागरबाई उध्दवराव हिवाळे,रणजित उध्दव  पुरी हे सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!