केसापुरी शिवारात विष बाधेतून सहा म्हैस मृत्यूमुखी

0 297

माजलगांव, प्रतिनिधी – भरवाड कुटुंबिय पोटाची खळगी भरण्यासाठी गुजरात सोडून महाराष्ट्रतील माजलगांव तालुक्यात मुरा गाई, म्हैस घेऊन मागील १५ वर्षा पासून वास्तव्यास आहे त्यांच्या कुटुंबातील ६ म्हैस विषबाधा होऊन आज सकाळी ९ ते ३ च्या दरम्यान जागीच मृत्यु मुखी पडल्या तर ४म्हशी अत्यवस्थ आहेत.बाजार भावा प्रमाणे एका म्हशींची किंमत आज १ लाख रु च्या घरात असून अंदाजे ९ते १० लाख रु चे नुकसान भरवाड कुटुंब चे झाल्याचे कुटुंब प्रमुख देवा रेवा भरवाड यांनी सांगितले.

भरवाड कुटुंब हे मागील ३५ वर्षापासून महाराष्ट्रात असून मागील १५ वर्षांपासून ते माजलगांव येथे वास्तव्यास आहेत. पारंपरिक दुधाचा व्यवसाय असल्याने ते माजलगांव तालुक्यात दूध घालून उदरनिर्वाह भागवित आहेत. रोज धरणाच्या कडेला मोकळ्या जागेत या सर्व म्हशी ना चाऱ्या साठी रोज सोडले जाते.आज सकाळी रोजच्या प्रमाणे या म्हशी चारा खाऊन आल्या त्यानंतर यातील २-३हशी च्या तोंडातून फेस येऊन त्या एका जागीच अत्यवस्थ अवस्थेत बसल्या.त्यांनी उपचारास ही दाद दिली नाही दु १२ ते ३ च्या दरम्यान या म्हशी नी प्राण सोडला.त्यांच्या ६ म्हैसी मृत्यू मुखी पडल्या तर ४म्हशी मृत्यूशी झुंज देत आहेत.या घटनेची तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे यांनी तात्काळ दखल घेऊन मंडळ अधिकारी मुळाटे यांना पंचनाम्याकरिता पाठवले या म्हशीचे शवविच्छेदन करून भरवाड कुटुंब स सरकार कडून योग्य मदत करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे डॉ प्रतिभा गोरे यांनी दै .शब्दराजची बोलताना सांगितले.

error: Content is protected !!