गोरखनाथ कुणगर यांची धनगर समाज सेवा संस्थेच्या महासचिव पदी निवड
निफाड,दि 09 (प्रतिनिधी)ः
महाराष्ट्रभर विखुरलेल्या धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करून त्यांना त्यांच्या सवलती मिळवून देण्याकरता धनगर समाज सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेच्या नाशिक महासचिवपदी न्यू दारणा हायस्कूलचे मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती धनगर समाज सेवा संस्थेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले यांनी दिली आहे.
धनगर समाज सेवा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे, कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले, शासकीय प्रथम श्रेणी अधिकारी बाजीराव शिंदे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर साहेब,शिवसेना ग्रामीण जिल्हा उपप्रमुख भाऊलाल तांबडे, गंगाधर बिडगर, नाशिक जिल्हा दूध संघाची माजी चेअरमन शिवाजीराव ढेपले, सारोळे खुर्द सोसायटीचे माजी चेअरमन नितीन वन्सी प्राध्यापक संदीप वन्से, प्रा सौ कीर्ती वन्से, केंद्रीय पत्रकार संघाचे संघटक रामभाऊ आवारे, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक देविदास लाड, संत चरित्र ग्रुपचे निर्माते ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, नवनाथ माऊली बोरगुडे, चासनळी विद्यालयाचे पर्यवेक्षक सी डी रोटे, पाथरशेंबे विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण आवारे, मुख्याध्यापक जालिंदर वाघ, कोटमगाव विद्यालयाचे मगन केदारे, तसेच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आदींसह विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
धनगर समाजाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध-
धनगर समाज महाराष्ट्रभर विखुरलेला असून धनगर समाजाला शासकीय योजना मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकासासाठी आपण संस्थेच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधून शासकीय योजना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून तसेच धनगर समाज सेवेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहुन समाजाच्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणून त्यांचे राहणीमान उंचावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
गोरखनाथ कुणगर – नाशिक महासचिव धनगर समाज सेवा संस्था.