जनता कर्फ्यु सक्तीचा नाही:जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर

0 635

परभणी,दि 25 ( प्रतिनिधी)ःकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि.26 ते 30 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्युची घोषणा झाली असली तरी  त्याबाबत कोणत्याही प्रकारचा आदेश पारित करण्यात आलेला नाही. जनता कर्फ्युसाठी प्रशासन स्तरावर कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही, याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

जिल्ह्ात कोरोनाचा उद्रेक झालेला असल्याने पुन्हा एकदा जनता कर्फ्युची गरज पुढे आल्याने तसेच तशी मागणी देखील होऊ लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने गुरुवारी पत्र काढत दि.26 ते 0 सप्टेंबर दरम्याण जनता कर्फ्यु असल्याचे जाहीर केले होते.मात्र त्यास व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.दरम्याण शुक्रवारी (दि.25) जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी पत्र काढत हा कर्फ्यु सक्तीचा नसल्याचे सांगीतले आहे.कोरोनाचा उद्रेक पाहता प्रत्येकानी काळजी घेणे गरजेेचे आहे.मात्र जनता कर्फ्यु हा सक्तीचा नाही.ज्यांना स्वंयस्फु्तीने अस्थापना बंद ठेवायच्या असतील त्यांनी बंद ठेवण्यास हरकत नाही.ज्यांना सुरु ठेवायच्या असतील तर त्यांनी सुरु ठेवा. वाहतुकीवर देखील कोणतेही निर्बंध नसल्याचे श्री.मुगळीकर यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!