जाक्तीजोतचं थाटात प्रकाशन

0 128

धुळे – नुकतंच धुळे शहरातील पुनम लाॅन्स येथे प्रविण पवार ह्या प्रवाही युवाकवीचा जाक्तीजोत हा वाघरी बोलीतला कवितासंग्रह त्यांच्या लग्नानिमित्त प्रमुख अतिथी प्रा.डाॅ.सदाशिव सुर्यवंशी, दत्तात्रय कल्याणकर, चंद्रकांत निकम, मयुर राजपूत, विकास पाटील,अमोल पाटील, ऋषिकेश तेलंगे,ललित कुलकर्णी, विजय माळी,निलेश गुरव,मयुर अमृतकर, राम बहारे, विजया पवार, दिनेश पवार, पुनम पवार, सुलोचना पवार, रत्नाबाई साळुंखे, रविंद्र साळुंखे, तन्वी पवार व नवीन दांपत्य प्रविण पवार आणि दिपाली पवार अशा एकवीस मान्यवर, कवींच्या हस्ते
प्रकाशित झाला.

जाक्तीजोत हा संग्रह बारा प्रवाहातून वाघरी बोली भाषेत शब्दस्थिर झाला आहे. कल्पनेपेक्षा तिव्र वास्तव ह्या संग्रहात आहे. हरवत चाललेल्या मायबोलीचं अस्तित्व टिकवून रहावं, आणि पिढ्यांपिढ्या लाभत आलेल्या सामाजिक प्रश्नांना जीवनातून हद्दपार करून, समाजात परिवर्तन घडावे यासाठी कवी प्रविण पवार यांची तळमळ जाक्तीजोतरूपी स्वनुभवातून दिसून येते.

प्रत्येक नवोदित युवा कवींनी एक आपत्य कमी पण एक पुस्तक जन्माला अवश्य येवू द्यायला हवे, असे वैचारिक संदेश समाजाला देण्यासाठी कवी प्रविण पवार आपल्या लग्नात जाक्तीजोत हा बोलीसंग्रह प्रकाशित केला आहे

error: Content is protected !!