ज्येष्ठ साहित्यकार ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांचे दुःखद निधन

0 228

पुणे – आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवन मांडणारे ज्येष्ठ साहित्यकार झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते.

उत्तम बंडू तुपे उर्फ आप्पा हे यांना त्यांची अतिशय गाजलेली ‘झुलवा’ कादंबरीमुळे झुलवाकार नावाने ओळखले जात होते.त्यांच्या अनेक कादंबऱ्याना पुरस्कार मिळाले.’आंदण’या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता.’काट्यावरची पोट’याआत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला होता.झुलवा कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.खुळी,कळा,कळाशी,नाक्षारी,भसम,चिपाड,इंजाल,झावळ,माती आणि माणसं या कादंबऱ्याही त्यांच्या विशेष गाजल्या होत्या.

ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांच्या ‘झुलवा’कादंबरीवरील नाटकात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या.या दोघांचा अभिनयाचा प्रवास येथूनच सुरु झाल्याचे बोलले जाते.

गेल्या अनेक महिन्यापासून ते पक्षाघातामुळे आजारी होते.त्यांची पत्नी जिजा यांचाही काही महिन्यापूर्वीच पक्षाघातामुळे मृत्यू झाला होता.उत्तम तुपे यांनाही त्रास वाढल्यामुळे २ दिवसांपूर्वी जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.आज अखेर झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांनी अखेरचा स्वास घेतला.त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलं आहेत

error: Content is protected !!