टाकरवण येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चार कोटी ७० लाखाचे पीककर्ज वाटप

0 101

आठशे नव्वद शेतकऱ्यांना मिळाले कर्ज

माजलगांव, (धनंजय माने):- तालुक्यातील टाकरवण येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आज पर्यत पहील्या टप्प्यात माफित आलेल्या चौदाशे पैकी आठशेनव्वद शेतकऱ्याना चारकोटी सत्तर लाखचे पीककर्जवाटप केले आहे.सध्या कोरोना रोगांची भितीने परेशानी होत आहे . पण शाखेचे बँक व्यवस्थापक आणि सहकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज योग्य वेळी मिळत आहे .तसेच नवीन अनेक शेतकरी पीककर्जाच्या प्रतिक्षेत आहे .

टाकरवण शाखेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यक्षेत्राप्रमाणे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरून दिलेले आहे . शासनाने सगळीकडे लॉकडाऊन केले असले तरी काही भागातील बँक सेवा सुरळीत चालू आहे . यामध्ये माजलगांव तालुक्यातील कोळगांव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कामकाज काही दिवसापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चालू आहे .

असे असेल तरी बँक प्रशासन आणि काही अडचणी सोडता जनतेच्या सहकार्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवून खरीप हंगाम असल्याने परिसरातील टाकरवण , बाबुलतारा , सुर्डी , शेलगांव , चोपड्याचीवाडी , दत्तबाग , रिधोरी , कवडगांव , हिवरा , सुर्डी बु , गव्हाणथडी , रामनगर आदी कार्यक्षेत्र मोठे असले तरी ही शेतकऱ्यांना पीककर्जाचे उदिष्टाप्रमाणे वाटप करण्यात येत आहे . त्याचबरोबर महात्मा फुले सन्मान कर्जमाफी योजनेचे कर्जदार शेतकरी , नवेजून पिककर्ज मोठी मागणी होत आहे.शाखा व्यवस्थापक भागवत पोटे , रोखपाल जाधव , शिपाईजाधव आदी सहकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे जास्तीत जास्त बँकेच्या ग्राहक आणि खातेदारांना उत्तमप्रकारे सेवा देऊन कागदपत्रे पुर्तता करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना आतापर्यंत चार कोटी ७० लाख रूपये शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटप झाले आहे तसेच पुढे ही प्रक्रिया सुरू राहत आहे .

“दैनंदिन कामकाज असो किंवा महात्मा जोतीबा फुले कर्जमाफीसन्मान योजना तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि नियमित खातेदारांची अग्रक्रमानेकाम केले जात असुन आज पर्यत आठशेनव्वदशेतकऱ्यानाचार कोटी ७० लाख रूपये पिककर्जवाठपकेले असुन उर्वरीत शेतकऱ्याना वाठप करण्याचे काम चालुच आहे.व नविन पिक कर्ज वाठपाचे वरिष्ठा कडुन आदेश आल्या नंतर ते देखिल चालु करण्यात येइल .

– भागवत पोटे , शाखा व्यवस्थापक , टाकरवण .

चिमूर तालुक्यातही शिरला कोरोना

 

error: Content is protected !!