देवाची आळंदी लवकरच कोरोणा मुक्त करणे हे पहीले प्राधान्य : नवनिर्वाचित मुख्याधिकारी अंकुश जाधव

0 97

आळंदी देवाची : आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन गिलबिले आणि गटनेते पांडुरंग वहीले यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आरोग्य समिती सभापती सागर भोसले, नगरसेविका श्रीमती रुक्मिणी कांबळे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, पत्रकार विलास काटे, तसेच नगरपरिषदचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

आळंदी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले की आपले पहीले प्राधान्य आळंदी शहर लवकरच कोरोणा मुक्त करण्यासाठी असेल यासाठी आळंदी शहरातील नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी भागातील रानभाज्या वाढवतायेत रोगप्रतिकार शक्ती

 

error: Content is protected !!