परभणी जिल्ह्यात श्री विसर्जनानिमित्त कडेकोट बंदोबस्त

0 54

परभणी,दि 18 (प्रतिनिधी)ः
दिनांक १० सप्टेंबर रोजीपासुन जिल्हा भरात गणेशोत्सवास सुरूवात झालेली असून रविवारी (दि.१९) श्री विसर्जन होणार आहे. जिल्हयाची सद्यःस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टिने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी जिल्हाभरात पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक जयंत मीना व अपर पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त सज्ज करण्यात आलेला आहे.
या बंदोबस्तामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक ०२ , पोलीस निरिक्षक १ ९ , सहायक पोलीस निरिक्षक ३६ पोलीस उप निरिक्षक ५५ , एकुण पोलीस संख्याबळा पैकी ९ ७३ महिला व पुरूष पोलीस कर्मचारी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले आहेत . तसेच पुरूष होमगार्ड ४ ९ १ व महिला होमगार्ड ६१ त्याच बरोबर पोलीस ठाण्याचे साध्या वेशातील पोलीस कर्मचारी व कॅमेरामन पोलीस कर्मचारी असे ३१ पोलीस कर्मचारी व ०२ – जलद कृती दल व आर.सी.पी. चे ०४ प्लाटून हे बंदोबस्त कामी तैनात करण्यात आलेले आहेत . त्याच बरोबर एस.आर.पी. बल गट क्रमांक २ पुणे येथील एस.आर.पी. कंपनी तसेच बाहेर जिल्हयातुन मागवण्यात आलेल्या बंदोबस्ता मध्ये पोलीस उप अधीक्षक -०१ व प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरिक्षक -१० असा बंदोबस्त जिल्ह्यात तैनात करण्यात आलेला आहे . गणेशोत्सव संबंधांने सीआरपीसी कलम १४ ९ च्या १४७७ , कलम -१०७ च्या १३६१ , कलम -११० च्या १५ ९ , मुपोका , कलम ५६ च्या २४ , कलम – ९ ३ च्या १३७ , कलम ९ ३ महाराष्ट्र दारुबंदी कायद्या च्या १३७ याप्रमाणे परभणी पोलीस दलाने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या आहेत . गणेश मंडळाचे पदाधिकारी व स्वंयसेवकांना सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) प्रमाणे दिनांक १६ ते ३० सप्टेंबरपर्यंतचा आदेश परभणी जिल्ह्यात लागू केला आहे . शासनाच्या आदेशा प्रमाणे विसर्जन करीता मिरवणूका निघणार नाहीत . विसर्जन स्थानिक प्रशासनाकडून मुर्ती संकलन करून त्यांचे एकत्रीत विसर्जन करण्यात येईल . तसेच शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे . संशयित व्यक्ती किंवा संशयीत वावरणाऱ्या व्यक्ती बाबत तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी. एखादया व्यक्तीकडे स्फोटके अथवा शस्त्रे आढळुन आल्यास , एखाद्या ठिकाणी संशयीत व बेवारस वस्तु किंवा वाहन मिळुन आल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी. ती जागा निर्मनुष्य करावी. त्या वस्तु बाबत आपल्या नजिकच्या पोलीस ठाण्यास व पोलीस नियंत्रण कक्ष ०२४५२-२२६२४४ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!