बारा बलुतेदारांना लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे 5 हजारांची स्वतंत्र आर्थिक मदत द्या -किनवट भाजपा
किनवट, आरविंद सुर्यवंशी – बारा बलुतेदारांचे लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे स्वतंत्र आर्थिक पॅकेज ची घोषणा करण्यात यावी अशा प्रकारची मागणी किनवट भाजपा च्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्तिकुमार पुजार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आपण राज्यात लाडावून जाहीर केली आहे. या लॉकडाउन जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु नाही सुतार, कुंभार, परीट इत्यादी बारा बलुतेदार छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे आधीच गरीब परिस्थिती असलेल्या हा समाज लॉकडाऊन मुळे अधिक जास्त अडचणीत सापडलेला आहे. एक प्रकारे या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आपण ,लॉकडाउन जाहीर करताना ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादी लोकांकरिता आर्थिक पॅकेज जाहीर केले. परंतु नाव्ही, सुतार, शिंपी, कुंभार, परीट इत्यादी बारा बलुतेदारांसाठी कुठलीही आर्थिक सहायता जाहीर केलेली नाही तेव्हा बारा बलुतेदार यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या बाराबलुतेदार मधील परंपरागत व्यवसायिकांना प्रति कुटुंब किमान 5 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशा प्रकारचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनावर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, जिल्हाध्यक्ष (ओबीसी) बाबुराव केंद्रे, शहराध्यक्ष फिरोज तवर , शहराध्यक्ष(ओबीसी) शिवा क्यातमवार, भाजपा (ओबीसी) आघाडी सरचिटणीस सुनील मच्छेवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत