बी बी एफ प्रशिक्षणद्वारे शेतकरी कृषी जनजागृती ‌‌

0 405

पालम ,प्रतिनिधी – सोयाबीन हे महाराष्ट्राचे प्रमुख खरीप पीक असून कोरडवाहू क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात त्याची लागवड केली जाते. पावसाची अनिश्चितता याकारणाने दर वर्षी सोयाबीन पिकाचे शाश्वत उत्पादन मिळत नाही व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

सोयाबीन पिकाची पाण्याची गरज व उत्पादनक्षम वाढीची गरज पाहता बी बी एफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने सोयाबीन लागवड करणे हि आज घडीला आवश्यक आहे.

याच अनुषंगाने तालुका कृषी कार्यालय पालम यांनी शेतकऱ्यांसाठी मोजे फरकंडा येथे बीबीएफ पेरणीयंत्राचे प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकरी बांधवामध्ये जनजागृती केली.

या कार्यक्रमात प्रत्यक्षपणे बीबीएफच्याद्वारे पेरणी कशी करायची याचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच पेरणी करताना येणाऱ्या अडचणी व बीबीएफ बद्दचे गैरसमज या विषयी चर्चासत्र आयोजित करत दूर करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी श्री. आबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करत सर्व शेतकऱ्यांना बी बी एफ च्या द्वारे पेरणी करण्याचे आवाहन केले. शेतकरी बांधवानी प्रात्यक्षिक आयोजित करून मोलाची माहिती मिळवून दिल्याबद्दल कृषी कार्यालयाचे आभार व्यक्त केले.

कृषी अधिकारी श्री. एस .बी चव्हाण, कृषी सहाय्यक श्री. डी. डी. दुधाटे यांनी प्रात्यक्षिकाचे सर्व आयोजन करत शेतकरी बांधवासाठी कृषी तंत्रज्ञान विस्ताराची एक संधी उपलब्ध करून दिली.

पावसाची हजेरी , कृषी दुकानांवर शेतकऱ्यांची गर्दी

 

error: Content is protected !!