बुलढाणा जिल्यात ७ जुलै ते २१ जुलै पर्यंत लॉक डाऊन पालकमंत्र्यांची घोषणा

0 144

बुलढाणा, प्रविण बुधवत – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू झाला असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ७ जुलै पासुन संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज येथील जिल्हा नियोजन सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे.

लॉक डाऊन दरम्यान दरम्यान’ सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत दुकानांना परवानगी राहील.इतर वेळेस कडक कर्फ्यु असणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्दे
१) बुलडाणा येथे स्वाब टेस्टिंग प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच १० जणांचा स्टाफ लागणार… हा प्रस्ताव ताबडतोब राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
२) आमदारांना रॅपिड अँटीजन टेस्ट किटसाठी १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे… आपल्याला १५ हजार किट किमान लागतील.
३) सोशल डिस्टनसिंग पाळली जात नाही, मास्क लावले जात नाहीत अशी पालकमंत्र्याची खंत व्यक्त केली.

औद्योगिक वसाहतीचे ग्रहण सुटता सुटेना महानगरातील युवक माजलगांव तालुक्यात परतले ; पण काम नाही



error: Content is protected !!