भाजपा वैद्यकीय आघाडीचे सेवाकार्य अतिशय मोलाचे – देवेंद्रजी फडणवीस
नांदेड, गजानन जोशी – महाराष्ट्र प्रदेश भाजप वैद्यकीय आघाडीच्या covid-19 हेल्पलाईनचे उद्घाटन मा.मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा देवेंद्र फडणवीस व सर्व मार्गदर्शक डॉक्टर,खासदार व आमदार मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून आघाडीतील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभूश्रीरामाला वंदन करून राम नामाच्या गजरात दीपप्रज्वलन व भाजपाच्या गीताने करण्यात आली.
रामनवमीचं औचित्य साधून (दि.२१ एप्रिल) रोजी भाजपा डिजिटल सभेचे आयोजन करण्यात आले,कार्यक्रमाची सुरुवात डॉ.गोविंद भताने (प्रदेश संयोजक डेंटल विंग भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र) यांनी मा.माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्रजी फडणवीस यांचा परिचय करून देत,सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे उदघाटक देवेंद्रजींनी कोरोना काळात कश्याप्रकारे जनतेची मदत केली,कश्याप्रकारे त्यांनी जनतेशी संवाद साधला याचाही उल्लेख डॉ.भताने यांनी केला.
तसेच मा.प्रवीणजी दरेकर, मा.गिरीशजी महाजन आणि मार्गदर्शक मंडळ डॉ.विकास महात्मे सर,माजी केंद्रीय मंत्री डॉ.सुभाषजी भामरे,डॉ.अनिलजी बोंडे,डॉ.भागवतजी कराड,भाजपा वैद्यकीय विद्यार्थी आघाडीच्या मार्गदर्शिका डॉ.प्रितमताई मुंडे,डॉ.भारतीताई पवार,डॉ.हीनाताई गावित तसेच डॉ.सुजयदादा विखे पाटील या प्रमुख अतिथींचे शब्दसुमानांनी स्वागत केले.
डॉ.अजितजी गोपछडे यांच्या कल्पकतेतून कोविड हेल्पलाईनची योजना गत दोन वर्षापासून अहोरात्र परिश्रम घेत आहे व त्यांच्या नेतृत्वात भारतीय वैद्यकीय आघाडी कश्याप्रकारे सेवाकार्यात तत्पर आहे याचाही उल्लेख त्यांनी केला.
डॉ.स्वप्नीलजी मंत्री ( प्रदेश समन्वयक भाजपा-वैद्यकीय आघाडी,महाराष्ट्र ) यांनी सर्वांचे स्वागत करून,बोलताना सांगितले की,वैद्यकीय आघाडी मध्ये सहभागी होण्याकरिता आधी लोकं तयार नव्हते पण आघाडीच काम बघून कश्याप्रकारे लोकांनी पुढाकार घेतला,याचाही पाठपुरवठा स्वप्नीलजी यांनी करून दिला. पुढे बोलताना स्वप्नीलजी यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील गड लढवतांना मराठ्यांनी ज्याप्रकारे झुंज दिली, त्याचप्रकारे कोरोनाच्या काळात वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकारी यांनी लढत दिली आहे,याचाही त्यांनी उल्लेख केला. आरोग्याचा पाठपुरवठा, लसिकरणाचा वेग वाढवू याचं आश्वासन दिलं.
त्यानंतर भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे यांनी सर्व मान्यवरांसमोर वैद्यकीय आघाडीचा लेखाजोखा मांडताना आघाडीतल्या विविध पदाधिकाऱ्यांनी कश्याप्रकारे रुग्णांना ऑक्सिजन,बेड, वेटिंलेटर बेड,रुग्णवाहीका,मानसिक आधार,समुपदेशन,रक्तदान शिबिरे व रेमेडिसिवीर आणि इतरही गोष्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,त्यात ही अनेक पदाधिकारी डॉ.राहुल कुलकर्णी,डॉ.मयूर राका,डॉ.विश्वेश ठाकरे,डॉ.स्वप्नील मंत्री हे कोविड संक्रमित झाले तरी त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न सोडला नाही.
देवेन्द्रजी यांनी भाजप वैद्यकीय आघाडीच्या सभेसाठी आपला एक तास काढून मार्गदर्शन केले यासाठी त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले,समर्पणाच्या व सेवाकार्य माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 25 डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडीकल, डेण्टिस्ट, फार्मासिस्ट, टेक्निशियन आरोग्य सेवक टीम तयार केली आहे व ही सर्व टीम विविध प्रकारच्या मदत लोकांना करणार आहे असे सांगितले…भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर्स देखील राजकारणामध्ये सक्रिय होऊन सोशल मीडियावर विरोधकांवर हल्ले करून प्रत्युत्तर देत आहेत,पुढे बोलताना डॉ.अजित गोपछडे यांनी संघटनेची चतु:सुत्री सांगितली.
१.समर्पण
२.सेवाकार्य
३.मानसिक आधार
४.विरोधक खोटेनाटे आरोप करत असताना प्रामाणिकपणे काम करताना विरोधकांना देखील सडेतोड उत्तर देण्यास सांगितले…
भाजपा संघटनात्मक 68 जिल्ह्यात सर्व ठिकाणी डॉक्टर्स,डेंटिस्ट,नर्सेस पँरामेडीकल,फार्मसिस्ट,टेक्निशियन, रेडिओग्राफर आरोग्य सेवक, यांचे संघटन झाले आहे,प्रत्येक जिल्ह्यात 25 डॉक्टर्स व पॅरामेडिकल्स याशिवाय काही मनोविकारतज्ञ आघाडीशी संलग्न झाले असुन कार्यरत आहेत, विद्यार्थी आघाडीही तत्परतेने काम करत आहे,याची कल्पना दिली व आणखी काम चांगल्या प्रकारे व्हावे म्हणुन कार्डिय़ाक रुग्णवाहिकेची मागणी केली.
गत सव्वा वर्षापासून भाजपा वैद्यकीय आघाडी कार्यरत आहे,स्क्रीनिंग पासून ते ट्रीटमेंट पर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या फेज टू मध्ये महत्त्वाचा आहे रोग्यांना मानसिक आधार व आरोग्याबाबत च्या मदतीचे पाठबळ असे देवेंद्रजी यांनी नमूद केले. सध्या महाराष्ट्रामध्ये अप्रत्याशित अवस्था पाहायला मिळते आहे शासनाचं कुठेही अस्तित्व दिसत नाही तसेच समन्वयाचा अभाव आहे.अनेक ठिकाणी बेड्स अवेलेबल नाहीत,ऑक्सिजन मिळत नाही , इंजेक्शन मिळत नाहीत ,फॅबीफलू सारख्या सामान्य गोळ्या देखील गायब आहेत. अशा अडचणींचा सामान्य माणसाला सामना करावा लागत आहे दुर्दैवाने covid-19 मध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे .सर्वात जास्त पेशंट ,सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्र मधे होत आहेत.सध्या टेस्ट कमी आहेत पण जर टेस्ट ची संख्या वाढवली तर एक भयावह परिस्थिती आपल्यासमोर येईल,भाजपा केवळ निवडणुका लढविणारा,विरोधी पक्ष म्हणून काम करणारा पक्ष नाही पण हा पक्ष सामाजिक जाणीव ठेवणारा आहे तसेच समाजासोबत जगणारा हा पक्ष आहे. समाज अडचणीत आहे तर जेवढे प्रयत्न आपल्याला समाजात मदत करायला करावे लागतील त्या प्रयत्नांची पराकाष्ठा बीजेपीचा प्रत्येक कार्यकर्ता करत आहे असे ते म्हणाले,याच प्रयत्नांचा उपक्रम म्हणून ही वैद्यकीय आघाडीची covid-19 व लसीकरण हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे व या द्वारे प्रत्येक जिल्ह्यासाठी ही सेवा दिली जाईल या महामारी मध्ये लोकांसमोर अनेक प्रश्न आहे की जायचे कुठे? मदत कोण करेल?अनेक लोक तर नुसते स्थानिक होऊन आजारी पडत आहेत व होत आहेत त्यांच्यासाठी दिलासा चे दोन शब्द बोलणार आता पाहिजे आहे व आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत व मदत करणार आहोत हाच त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा दिलासा ठरत आहे.या हेल्पलाइनच्या माध्यमातून जी व्यवस्था उभी होणार आहे त्यातून लोकांना खूप फायदा होणार आहे व या व्यवस्थेमध्ये उत्तमात उत्तम आपण लोकांना काय देऊ शकू याचा विचार सर्वांनी इथे केला पाहिजे.या हेल्पलाइन बद्दल लोकप्रतिनिधींना पण माहिती मिळेल व कोणत्या विभागात कुठली टीम कार्यरत होणार आहे हे देखील लक्षात येईल आता आपण थकून उपयोग नाही अजून तीन ते चार महिने आपल्याला एकत्र जोमाने काम करावे लागणार आहे आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत ही लढाई लढावी लागणार आहे.
वैद्यकीय विद्यार्थी आघाडीचे डॉ.विश्वेष ठाकरे यांनी रामनवमीच्या शुभेछा दिल्या व आभार प्रदर्शन करतांना सर्व प्रमुख मान्यवर अतिथींचे आभार मानले,वैद्यकीय आघाडीचे शिलेदार डॉ.अजित गोपछडे यांचा हा कार्यक्रम घडवून आणन्यात महत्त्वाचा वाटा आहे.
यावेळी प्रदेश समन्वयक डॉ स्वप्नील बी मंत्री,प्रदेश सहसंयोजक डॉ बाळासाहेब हरपळे,डॉ प्रमोद कुबडे,विभागीय संयोजक डॉ राहुल कुलकर्णी,डॉ प्रशांत पाटील,डॉ सचिन बगडिया,डॉ मेघना चौगुले,डॉ किशोर मालोकार,डॉ अनुप मरार समन्वयक डॉ महेश मोहरीर,डॉ विंकी रुघवानी,डॉ स्मिता काळे,डॉ मंजुषा दराडे, डॉ माधुरी शहा, डॉ पूनम तिवारी, डॉ कल्पना गोडबोले,डॉ क्षिप्रा आफळे,डॉ कृष्णा वोरा, प्रदेश संयोजक डेंटल विंग डॉ गोविंद भताने, प्रदेश संयोजक आयुर्वेद डॉ उज्ज्वला हाके,डाॅ.सुनिल आवारी,डॉ.संजय लोंढे,डॉ सुदर्शन मुंडे,होमिओपॅथी डॉ भालचंद्र ठाकरे प्रदेश संयोजक पॅरामेडिकल विभाग श्री.संजय धोत्रे,प्रदेश संयोजक फार्मसी विभाग श्री राकेश जैन, श्री योगेश जोशी. सहसंयोजक डॉ राजकुमार त्रिपाठी, डॉ रूपाली धर्माधिकारी, डॉ विष्णू बावणे, डॉ अभय वणवे, डॉ संगीता पाटील, डॉ राजेश फडकुले,डॉ अनिल महाजन व,तसेच राज्यातील विभागीय संयोजक व सर्व राज्य पदाधिकारी,विभागीय संयोजक,सहसंयोजक, विंग संयोजक, सहसंयोजक, जिल्हा संयोजक, तालुका संयोजक व सर्व भाजपा वैद्यकीय आघाडीच्या व विद्यार्थी आघाडीच्या सर्व पदाधिकारी तसेच येणाऱ्या काळात कोविड हेल्पलाइनच्या माध्यमातून जनसेवा अजून करता येईल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली.
भाजपा वैद्यकीय आघाडीबद्दल बोलतांना म्हणाले की डॉ.अजितजी गोपछडे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आघाडीची सुरवात अतिशय योग्य पद्धतीने झाली त्यांचे अभिनंदन व कौतुक केले पाहिजे ज्यात आघाडीतल्या विविध भागातल्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी कोविडच्या प्रथम दिवसापासुन रुग्णांच्या सेवेकरिता ऑक्सिजन व वेटिंलेटर बेडची व्यवस्था, रेमेडिसिवीरची उपलबद्धता, कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल्स तसेच वेळेवर रुग्णांना हवी असलेली सर्व मदत करण्यासाठी प्रयत्न केले,त्यात त्यांनी अस ही म्हटलं कि भाजप महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी ही अल्प वेळेत अधिक चर्चेत आलेली संघटना आहे,देवेन्द्रजी यांनी महाराष्ट्रातल्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस डेंटिस्ट, पँरामेडीकल, फार्मसिस्ट, टेक्निशियन व आरोग्य सेवक यांचे कौतुक व अभिनंदन केले.
विपक्ष नेते देवेन्द्रजी फडणवीस
वैद्यकीय आघाडी कोविड हेल्पलाईन ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरेल असे मत व्यक्त केले कित्येक रुग्णांना याचा फायदा होईल व सोबत लसीकरण मोहीम अधिक प्रभावी पणे अंमलात येईल व स्वत: ते सुद्धा कोराना महामारी मध्ये अनेक रुग्णांना मदत करत आहेत .केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहेत ,त्यामध्ये कोरोना हॉस्पिटल मधे ऑक्सिजन ची सेवा अविरतपणे पुरवत आहेत त्याच बरोबर रुग्णसेवा हे काम प्रत्येकाच्या हृदयाला ला भिडणारे आहे यामुळे लोकांचे आशीर्वाद मिळतात व आपल्याला देखील समाधान वाटते की आपण एक चांगले काम करत आहोत.त्यांनी डॉ अजित गोपछडे सर व सर्व वैद्यकीय आघाडी चे संयोजक सहसंयोजक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पद्मश्री खासदार डॉ.विकासजी महात्मे
सर्वप्रथम वैद्यकीय आघाडी कोविड हेल्पलाईन साठी शुभेच्छा दिल्या व प्रदेशाध्यक्ष डॉ.अजितजी गोपछडे यांचे आभार मानले त्या म्हणाल्या खरेतर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भाषणानंतर बोलणे म्हणजे मेडिकल विद्यार्थीच्या वायवा सारखे झाले,पहिले टॉपर विद्यार्थी बोलल्या नंतर काय बोलावे काही समजत नाही,त्यानंतर त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी आघाडी चे संयोजक मयुर रांका यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व या हेल्पलाईन मुळे आमच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना खूप फायदा होईल कारण रोज आम्हाला कित्येक कॉल येत आहेत पण सगळ्या लोकांना मदत करणे शक्य होत नाही .पण या हेल्पलाईन मुळे प्रत्येक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचता येईल कारण यामध्ये प्रत्येक जिल्हया मधुन २५-३० तज्ञ डॉकटर्स ची टीम काम करणार आहे हे खुप उल्लेखनीय कार्य या कोरोना काळा मध्ये होणार आहे. वैद्यकीय आघाडी च्या टीमने जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावे असे त्यांनी आवाहन केले. “वन्स डॉक्टर इज ऑल्वेज डॉक्टर,डॉक्टर इस नोट फ्री फिक्स सुपर पावर सुपर पावर गोईंग टू फाईट” असे म्हणून त्यांनी त्यांचे मार्गदर्शनाची सांगता केली.
खासदार डॉ.प्रीतमताई मुंढे
माझा मतदारसंघ आदिवासी भागात येतो त्यामुळे इथल्या रुग्णांना तशी सुविधा मिळु शकत नाही म्हणून ते पुणे, नाशिक, जळगाव ला जातात,त्यांचे कॉल येतात तेव्हा प्रश्न पडतो की कोणाकड़े मदत मागावी पण वैद्यकीय आघाडी हेल्पलाईन मुळे हे काम खुप सोपे झाले त्यांनी सर्व वैद्यकीय आघाडी पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
खासदार डॉ.हीनाताई गावित
डॉ.कराड यांनी संबोधित करताना 3 मुद्दे सांगितले त्यात १. टेस्टिंग 2. ट्रेसिंग 3. ट्रीटमेंट आणि हे सगळं आपण करतोय . पण ट्रीटमेंटमध्ये विस्कळीत पणा आला आहे. संभाजीनगर मध्ये त्यांनी महानगरपालीकेमध्ये शिफारस करून ENT surgeon आणि डेंटिस्ट यांना काम करण्याची संधी दिली व त्यांनी स्वत: देखील मागिल वर्षा पासून कोविड वॉर रूम चालू करुन जन सेवा करत आहेत असे सांगितले व सोशल मीडिया वर active राहून सत्ते मधील लोकांच्या टिकेला जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे .
नंतर त्यानी असं सांगितालेकी जी टीम तुम्ही तयार केली आहे त्यानी ग्रोउंड लेवल बीजेपी कार्यकर्त्याशी संपर्क साधून काम करावे व सर्व आपण सोबत येउन हे लडाई जिंकू असे म्हणू न एक जोश निर्माण केला.
खासदार डॉ.भागवत कराड
संभाजीनगर IMA अध्यक्ष डॉ. संतोष जी रंजलकर सेक्रेटरी डॉ यशवंत गाडे देखील या हेल्पलाइन मध्ये काम करणार आहेत व आपले सदस्य आहेत, तसेच महिला प्रतिनिधी डॉ.रुपाली धर्माधिकारी, डॉ.रेणू बोराळकर हे सर्व जणं डॉ भागवत कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाख़ाली काम करतील व सर्व जिल्हा अध्यक्ष देखील विश्वासात घेऊन काम करू असे आश्वासन देत आपले मत मांडले.
डॉ.अजित गोपछडे
रामनवमीच्या शुभेच्छा देत,वैद्यकीय आघाडीला मार्गदर्शन करण्यास सुरवात केली.मेडिकल सेल चे अभिनंदन करत त्यांनी पाहिली लाट असो वा दुसरी मेडिकल सेल चे काम सामाजीक भान ठेवून सुरू आहे याचे कौतुक केले.केंद्रीय आरोग्य मंत्री तसेच ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया चे अध्यक्ष यांच्या सहित चर्चा केली असता ही बाब समोर आली की दीड लाख इन्जेक्शनचे मॅन्युफॅक्चरिंग रोज होत आहे.
तरी ती रुग्णांपर्यंत पोहचत नाहीये असे या वेळी मा.डॉ.सुभाष भामरे यांनी नमूद केले,त्याच बरोबर डॉक्टरांचे देखील प्रबोधन करणे गरजेचे आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना हे इन्जेक्शन गरजेचेच आहे असे सांगून गंभीर वातावरण निर्मिती त्यांनी करू नये,त्यामुळे साठेबाजी,काळाबाजार वाढत आहे या कडे लक्ष देण्याची गरज आहे,Prevention is better than cure हा एकच पर्याय आपल्या कडे आहे त्यामुळे लसीकरण खूप मोलाचे काम करत आहे. लसीकरण घेऊन ही कोरोना होऊ शकतो पण रोगाची तीव्रता कमी होते.
ऑक्सिजन साठी मशीन आपली मदतगार होईल ती उपलब्ध करुन देण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करत आहेत. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ऑक्सिजन सप्लाय साठी खूप मोठी कामगिरी केली आहे आणि येत्या 2 दिवसात राज्यात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे असे त्यांनी नमूद केले,ज्या प्रमाणे मेडीको काम करत आहे ते कार्य कदाचित सामान्य कार्यकर्त्याला ही शक्य होणार नाही.मेडिकल सेल चे काम हे कौतुकाचे आहे,अगोदर देश मग नागरिक आणि शेवटी पक्ष,या तत्वाने काम करू वैद्यकीय सेल चे काम महत्त्वाचे आहे.
खासदार डॉ.सुभाष भामरे
लसीकरणाची साठी लोकांना जास्तीतजास्त जागृत करण्याची गरज असल्याचे सांगितले त्याचबरोबर कोविडचे अर्ली डिटेक्शन देखील खूप गरजेचे आहे जेणेकरून दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ येणार नाही,त्याच बरोबर सर्व आघाडीच्या डॉक्टर्सनी सोशल मीडियावर आत्ताच्या सत्ताधारी पक्षाचा काळा कारभार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत रहावे.जिल्ह्या बरोबरच तालुकास्तरावर देखील आघाडीच्या डॉक्टर्सनी काम करणे खूप गरजेचे आहे,लसीकरणा बाबतच्या गैरसमजुती या सरकारने पसर वलेल्या आहेत त्यासुद्धा गैरसमजुती लोकांच्या मनातून घालवणे गरजेचे आहे यावर आघाडीने काम करावे…
खा.डॉ.भारतीताई पवार
मा.माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्रजी फडणवीस साहेब,तसेच मा.प्रवीणजी दरेकर साहेब,वैद्यकीय आघाडीचे पालक मा.गिरीशजी महाजन साहेब आणि मार्गदर्शक मंडळ डॉ विकासजी महात्मे,माजी केंद्रीय मंत्री सुभाषजी भामरे,डॉ.अनिलजी बोंडे,डॉ.भागवतजी कराड,भाजपा वैद्यकीय विद्यार्थी आघाडीच्या मार्गदर्शिका डॉ प्रितमताई मुंडे,डॉ.भारतीताई पवार,डॉ.हीनाताई गावित या सर्वांची विशेष उपस्थिती होती.