महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त नृसिंह पोखर्णी येथे वृक्षारोपण

0 133

परभणी, प्रतिनिधी – पोखर्णी (नृसिंह ) ता .परभणी येथे महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपन करून वेगळ्या पध्दतीने म.गांधी जयंती साजरी करण्यात आली.

tejgyan
महात्मा गांधी यांच्या जयंती चे औचित्य साधून पुणे येथील एन. जी. ओ. फेडरेशन आणि नृसिंह पोखर्णी येथील संकल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील खदान जवळील महादेव मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एन.जी.ओ फेडरेशन पुणे यांच्यावतीने कोरोना आजारावर गुणकारी अशा औषधी काड्यांचे पावडर व मास्क चे वाटप डोंबे नाना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वड, पिंपळ, नारळ, चिंच, करंजी व इतर 20 झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रमाकांतजी जोशी, उद्धवजी डोंबे, अर्जुन मासोळकर, कृष्णा बिंडे, सुरज बेले, कृष्णा धोत्रे, लखन बिंडे, गोविंद कांबळे, विश्वास गायकर, अजय धोत्रे, शिवराज मासोळकर, मुंजा वाघ, अकाश पतंगे, ओमकार पतंगे, रोहन जलाले, गणेश एडके,प्रकाश एडके,परमेश्वर वाघ,गोविंद भंडारी,सदाशिव कीर्तनकार,नरहरी वाघ,बालाजी वाघ,उद्धव उंडाळकर,शिवलिंग साखरे, मुंजा वाघ, दादाराव मोधळ, अनिरुद्ध पांचाळ, राहुल पौवळे यांनी श्रमदानाचे कार्य केले. येणाऱ्या काळात या ठिकाणी पाचशे झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे संकल्प फाऊंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.

error: Content is protected !!